Dhule Accident: भरधाव पिकअपच्या धडकेत 5 ठार; चार गंभीर जखमी, शिंदखेडा शहरावर शोककळा!

 जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने शिंदखेडा शहरावर शोककळा पसरली आहे.
Dhule Accident: भरधाव पिकअपच्या धडकेत 5 ठार; चार गंभीर जखमी, शिंदखेडा शहरावर शोककळा!sakal
Updated on

Latest Dhule News: शिंदखेडा येथील भाविक वारूड (ता. शिंदखेडा) येथून रामकथेहून रविवारी (ता. १५) पहाटे दीडच्या सुमारास शिंदखेडा येथे इको (एमएच १८, बीएक्स ०५३९) गाडीने परत येत असताना होळ ते दसवेलदरम्यान समोरून येणाऱ्या मालवाहतूक बोलेरो पिकअपने (एमएच ०४, ईवाय ६०२१) जोरदार धडक दिली.

यात एक महिला, दोन तरुणी व दोन तरुण असे पाच जण जागीच ठार झाले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने शिंदखेडा शहरावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.