चिमठाणे : कुलस्वामिनी पेडकाईदेवी मातेचा नवस फेडून परत जाणाऱ्या मालवाहतूक पिक-अपला बुधवारी (ता. १७) दुपारी सव्वादोनच्या सुमारास नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या एसटी बसने चिमठाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळ दिलेल्या धडकेत मालवाहतूक करणाऱ्या वाहनातील तीन महिला व चार जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना सोनगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात व धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेल्याने नावे उपलब्ध होऊ शकली नाहीत. (Dhule Accident News)
रामनवमी व कुलस्वामिनी पेडकाईदेवी मातेचा यात्रोत्सव असल्याने लाखो भाविक नवस फेडण्यासाठी येतात. वार-कुंडाणे (ता. धुळे) येथील भाविक मालवाहतूक वाहनाने (एमएच १२, क्यूजी ५६६४) नवस फेडण्यासाठी आले होते.
दुपारी नवस फेडल्यानंतर गावी परत जाताना चिमठाणेपासून सोनगीरकडे दोन किलोमीटरवर सव्वादोनच्या सुमारास समोरून येणाऱ्या शहादा आगाराची नाशिक-शहादा बस (एमएच ०६, एस ८६०९)ने धडक दिल्याने मालवाहतूक वाहनातील तीन महिला व चार जण गंभीर जखमी झाले.
त्यांना सोनगीर येथील उपजिल्हा रुग्णालय व धुळे येथील जिल्हा रुग्णालयात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने नेण्यात आले. मात्र जखमींची नावे समजू शकली नाहीत.
दोन तास वाहतूक ठप्प
सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्ग एकवर चिमठाणेजवळ बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा अपघात झाल्याने दोंडाईचाकडे दोन किलोमीटर व सोनगीरकडे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
पेडकाईदेवी येथे बंदोबस्तासाठी असलेले शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक उपनिरीक्षक जी. जी. ठाकरे, हवालदार प्रशांत पवार, नाईक साबीर शेख यांनी वाहतूक सुरळीत केली. बसचालक हेमकांत रत्नाकर कामटे यांनी हे रात्री उशिरापर्यंत शिंदखेडा पोलिस ठाण्यात होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.