Dhule News : हेंद्रुण येथील ॲग्रो सेंटरवर कारवाई; जादा दराने कापूस बियाणे विक्री

Dhule : जादा दराने कापूस बियाणे विक्री केल्याप्रकरणी हेंद्रुण (ता. धुळे) येथील एका ॲग्रो सेंटरवर भरारी पथकाने कारवाई केली.
In the case of selling cotton seeds at excessive price, May. Bharari team of Agriculture Department taking action on Saibaba Agro Center.
In the case of selling cotton seeds at excessive price, May. Bharari team of Agriculture Department taking action on Saibaba Agro Center.esakal
Updated on

Dhule News : जादा दराने कापूस बियाणे विक्री केल्याप्रकरणी हेंद्रुण (ता. धुळे) येथील एका ॲग्रो सेंटरवर भरारी पथकाने कारवाई केली. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मे. साईबाबा ॲग्रो सेंटर येथे भरारी पथकाने त्यांच्या समक्ष एक बनावट ग्राहक पाठवून एका नामांकित कंपनीच्या बियाण्याच्या दोन पाकिटांची मागणी केली. बियाणे विक्रेत्याने ही पाकिटे ८६४ रुपये प्रतिपाकीट किंमत असताना बनावट ग्राहकाकडून एक हजार १२५ रुपये मागणी केली. (Action taken against Agro Center in Hendrun for selling cotton seeds at excessive price )

मात्र बियाणे पाकिटे विक्रीपोटी बिल देताना रक्कम रुपये प्रतिबियाणे पाकीट याप्रमाणेच दिली. या प्रकरणी बनावट ग्राहकाने पाकीट ताब्यात घेतल्यानंतर तातडीने भरारी पथकाने छापा मारून सर्व पाकिटे जप्त केली. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात तक्रार देत मे. साईबाबा ॲग्रो सेंटरचे परवानाधारक ज्ञानेश्वर दगडू नवसारे व मनोहर दगडू नवसारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

In the case of selling cotton seeds at excessive price, May. Bharari team of Agriculture Department taking action on Saibaba Agro Center.
Dhule News: शिंदखेड्यात दुष्काळी अनुदान परस्पर कर्ज खात्यात वर्ग! बँकांची मनमानी; राज्य शासनाच्या आदेशाला ‘केराची टोपली’!

महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा-२००९, बियाणे कायदा-१९६६, बियाणे नियंत्रण आदेश-१९८३, अत्यावश्यक वस्तू कायदा-१९५५ व भादंवि १८६० मधील कलम ४२०/३४ अन्वये हा गुन्हा दाखल झाला. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईसाठी विभागीय नियंत्रण निरीक्षक नीतेंद्र पानपाटील, मोहीम अधिकारी प्रदीप निकम, तालुका कृषी अधिकारी वाल्मीक प्रकाश, तंत्र सहाय्यक खुशाल पाटील, प्रेमजित गिरासे, मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले. पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत. दरम्यान, कुणीही जादा दराने कृषी निविष्ठा खरेदी करू नये. अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करताना पक्की पावती मागावी. कृषी निविष्ठा खरेदी करताना अडचण असल्यास शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक वाघ यांनी केले आहे.

In the case of selling cotton seeds at excessive price, May. Bharari team of Agriculture Department taking action on Saibaba Agro Center.
Dhule News: मुलांची ‘हिरो‘गिरी; पालकांना भुर्दंड! 18 वर्षाखालील, विनापरवाना दुचाकीचालक विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.