Dhule News : मैत्रिणींनो... स्वस्थ, मस्त अन् आनंदाने जगा! : आयुक्त अमिता दगडे-पाटील

Dhule : महिलांनी स्वतःची काळजी घेऊन स्वस्थ, मस्त अन् आनंदी आयुष्य जगावे, असे आवाहन धुळे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी केले.
occasion of International Women's Day, former office bearers, officers and employees attended the program to honor Nari Shakti in the Municipal Corporation.
occasion of International Women's Day, former office bearers, officers and employees attended the program to honor Nari Shakti in the Municipal Corporation.esakal
Updated on

Dhule News : महिला या आपल्या परिवाराचा पर्यायाने समाजाचा मोठा आधार आहेत. त्यामुळे या आधारवड महिलांनी स्वतःची काळजी घेऊन स्वस्थ, मस्त अन् आनंदी आयुष्य जगावे, असे आवाहन धुळे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त धुळे महापालिकेतर्फे आयुक्त श्रीमती दगडे-पाटील संकल्पनेतून शनिवारी (ता. ९) महापालिकेच्या सभागृहात ‘सन्मान नारीशक्तीचा’ हा कार्यक्रम झाला. (Dhule Administrator Amita Dagade Patil statement Women should take care of themselves and live healthy and happy life)

माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी महापौर कल्पना महाले, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, उपायुक्त शोभा बाविस्कर, करमूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रणरागिणी राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन करण्यात आले.

मान्यवरांचे बोल

माजी महापौर श्रीमती अहिरराव म्हणाल्या, की परिवाराच्या प्रत्येक क्षणाला स्त्रीची गरज असते. भारत हा मातृशक्तीचा देश आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत मातेला म्हणजेच महिलांना सन्मान दिला जातो. माजी महापौर श्रीमती महाले यांनी स्त्री हा कुटुंबाचा पाया असतो. हा पाया मजबूत राहावा म्हणून महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

आज धुळे महापालिकेत महिलाराज असून, या शहराच्या विकासात महिलांची भूमिका फार मोठी असल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांची शक्‍ती फार मोठी आहे. प्रत्येक घरात देव पोचू शकत नाही. त्यामुळे तो आईच्या रूपाने प्रत्येक घरात आलेला आहे. म्हणून महिलांना सन्मान देण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे माजी महापौर श्रीमती चौधरी म्हणाल्या. (latest marathi news)

occasion of International Women's Day, former office bearers, officers and employees attended the program to honor Nari Shakti in the Municipal Corporation.
Dhule News : शिंदखेड्यात साडेचार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांच्यातर्फे टिफिन बॉक्स व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सफाई कर्मचारी भगिनींना प्रातिधिनिक स्वरूपात साडीवाटप करण्यात आले. माजी महापौर श्रीमती अहिरराव यांच्यातर्फे उपस्थित सर्व महिला अधिकाऱ्यांना सन्मानपत्र देण्यात आले. समारोपप्रसंगी करमूल्य निर्धारण अधिकारी श्रीमती शिरसाठ यांनी उपस्थितांना मतदान जागृतीची शपथ दिली.

उपायुक्‍त डॉ. नांदूरकर यांनी प्रास्ताविकातून महिलांना अशा कार्यक्रमातून प्रेरणा घ्यावा, परिवार व समाजाला दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन केले. कल्याणी कच्छवा यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी मीना सातभाई, भारती चौधरी, चंदा शेख, वर्षा पाटील यांनी परिश्रम घेतले.

कविता, गाणीही सादर

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यात स्वच्छता कर्मचारी प्रतिभा शिंदे व कर्मचारी सारिका चव्हाण यांनी कविता व गीतगायन करून उपस्थितांची दाद मिळविली. कार्यक्रमाला स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर, महिला वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कार्यालयीन महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

occasion of International Women's Day, former office bearers, officers and employees attended the program to honor Nari Shakti in the Municipal Corporation.
Dhule News : धुळ्यासाठी 3 ‘आपत्कालीन शेल्टर टेन्ट’; स्वयंसेवकांना प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.