Dhule Agriculture News : जिल्ह्यात 76.37 टक्के खरीप पेरण्या; कृषी विभागाचा अंदाज

Dhule Agriculture : यंदा वेळेआधी धुळे जिल्ह्यात पावसाने बहुतेक ठिकाणी मृग नक्षत्रात म्हणजेच चक्क सात जूनला हजेरी लावली.
Young farmer spraying herbicide in Deurchamatha Shivara.
Young farmer spraying herbicide in Deurchamatha Shivara.esakal
Updated on

Dhule Agriculture News : यंदा वेळेआधी धुळे जिल्ह्यात पावसाने बहुतेक ठिकाणी मृग नक्षत्रात म्हणजेच चक्क सात जूनला हजेरी लावली. मृगात कासवगतीने बरसलेला वरुण राजा पुन्हा आर्द्रा नक्षत्रात बऱ्यापैकी बळीराजाच्या दिमतीला हजर झाला. जिल्ह्यात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने खरीप पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून आज अखेर सुमारे ७६.३७ टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. (76 percent kharif sowing in district Estimates of Department of Agriculture)

आरंभी केवळ धुळे तालुक्यात जोरदार हजेरी लावत सलामी देणाऱ्या पावसाने आर्द्रा नक्षत्रात साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात मेघसरींनी हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यात आजअखेर तीन लाख ७९ हजार सहाशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रात पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून दोन लाख ८९ हजार नऊशे नऊ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. सुमारे ७६.३७ टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. यंदा दोन लाख तीन हजार चार हेक्टरवर पांढरे सोनं (कापूस) तर त्या खालोखाल एक लाख २८ हजार सातशे बारा हेक्टरवर तृणधान्याची पेरणी होईल.

दुष्काळातून बळीराजाची सुटका होईल

गेल्या वर्षीच्या तीव्र दुष्काळाने बळिराजा पुरता पिचून गेला आहे. हवामान विभाग व वेध शाळेच्या अंदाजानुसार चांगल्या दमदार पावसाचे संकेत मिळाल्याने तूर्तास दिलासा मिळाला आहे. शुक्रवार (ता.५) पासून पुनर्वसू नक्षत्रास आरंभ झाला आहे. कमी-अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पेरणी कामांनी वेग घेतला आहे. ज्या भागात लवकर पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी कोळपणी, विरळणी, रासायनिक खते देणे, निंदणी व तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी केली जात आहे.

जिल्ह्यात पांढरे सोनं अर्थात कापूस एक लाख ८८ हजार ८८४ हेक्टर (दोन लाख तीन हजार चार हेक्टर अपेक्षित), कडधान्ये- उडीद, मुग आठ हजार ३४६ हेक्टर (वीस हजार सहाशे चार हेक्टर अपेक्षित),तृणधान्य- बाजरी, मका, ज्वारी ७३ हजार ७११ हेक्टर (एक लाख २८ हजार सातशे बारा हेक्टर अपेक्षित), गळीत धान्याची- भुईमूग, सोयाबीन १८ हजार ९६८‌ (२७ हजार तीनशे नऊ हेक्टर अपेक्षित)हेक्टरवर आज अखेर पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. (latest marathi news)

Young farmer spraying herbicide in Deurchamatha Shivara.
Dhule Agriculture News : नव्या खरिपात कोरडवाहू पिकांचाच बोलबाला; साक्री तालुक्यात शेतकरी पुन्हा शेतीकामात गुंग

यंदा पावसाच्या भरवशावर कापूस लागवडीच्या क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत काहीअंशी वाढ झाली आहे. विहिरींना पाणी नसल्याने बागायती क्षेत्रात कपाशी लागवड कमी झाली आहे. दोन लाख तीन हजार हेक्टरवर कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. मका पेरणी क्षेत्रातही वाढीचा अंदाज आहे. तृणधान्यातील इतर पिकांपेक्षा मका पिकाची पेरणी अधिक आहे. मका पिकाकडे शेतकरी अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित करतात. कारण मका पीक कमी खर्चिक आणि परवडणारे पीक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जोरदार पावसाची प्रतीक्षा

यंदा चांगला, दमदार पाऊस होईल असा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळाने होरपळून निघालेल्या बळीराजाला पावसाच्या दमदार हजेरीमुळे दिलासा मिळाला आहे. बागायती, जिरायती शेतकऱ्यांचे पैशाचे पीक म्हणून कपाशी खालोखाल भुईमूग, कांदा व मका पिकाकडे पाहिले जाते. यंदा वर्षभर पावसाचे प्रमाण चांगले राहील, या अंदाजाने खरिपात कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

दोन लाखापेक्षा अधिक हेक्टरवर कापूस लागवडीचा अंदाज आहे. गत खरिपात ११९.४२ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती. मात्र, पावसाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही. नगदी पीक असल्याने कापूस उत्पादनाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा असतो. त्याशिवाय मका उत्पादनाकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून मका लागवडीखालील क्षेत्रही वाढत आहे.

रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामांत शेतकरी मका उत्पादन घेत आहे. मागील खरीप हंगामात ६० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रावर अर्थात १०५.३ टक्के मका पेरणी झाली होती. यंदा ६७ हजार ७०० हेक्टरवर मका घेतला जाईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सात हजार हेक्टरने मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. धुळे तालुक्यात १६ हजार८००, साक्री २९ हजार ५००, शिंदखेडा दहा हजार ६०० व शिरपूर तालुक्यात दहा हजार ८०० हेक्टरवर मका पेरणीचे नियोजन आहे.

''यंदा खरीप पिकात कोरडवाहू क्षेत्रात तृणधान्य, कडधान्याची पेरणी झाली आहे. सध्या भीज पावसामुळे लवकर पेरणी झालेली खरीप पिके तरारली असून जलस्तर वाढीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहेच.''- के. आर. शिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे.

Young farmer spraying herbicide in Deurchamatha Shivara.
Dhule Agriculture News : शिंदखेड्यात कापसाचे क्षेत्र घटणार; मकाचे क्षेत्र वाढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.