धुळे : महापालिकेत जुन्या अधिकाऱ्यांसह काही नवीन अधिकारी रुजू झाले. एक-दोन अधिकाऱ्यांची बदली झाली. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी या प्रमुख अधिकाऱ्यांना विविध विभागांची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या विभाग वाटपाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. (Dhule Allotment of new posting to municipal officials marathi news)
धुळे महापालिकेत नवीन आलेल्या काही अधिकाऱ्यांना बरेच दिवस झाल्यानंतरही त्यांच्याकडे कोणत्याही विभागाची जबाबदारी नव्हती. दरम्यान, आता या नवीन अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांकडे नव्याने विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी तसे आदेश निर्गमित केले आहेत.
कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता, गतिमानता येण्याकरिता अधिकाऱ्यांकडे त्या-त्या विभागांची जबाबदारी सोपविल्याचे आदेशात म्हटले आहे. अतिरिक्त आयुक्त, तीन उपायुक्त, एक सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, नगररचनाकार या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
संबंधित अधिकाऱ्यांकडे विभागांची जबाबदारी सोपविताना याच अधिकाऱ्यांकडे इतर विभागांसाठी अपिलीय अधिकाऱ्याची जबाबदारीही सोपविली आहे. दरम्यान, साधारण सर्व विभागांच्या कामांच्या अंतिम मंजुरीचे अधिकार आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडेच आहेत. (latest marathi news)
अधिकारी व विभाग असे
-अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे ः एक हजार ५०० स्क्वेअर फूट मर्यादेतील बांधकाम परवानगी, सभा कामकाज, मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांचे दौरे, लोकायुक्त सुनावणी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, बाजार विभाग, परवाना विभाग, मालमत्ता मिळकत विकास व्यवस्थापन.
-उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर ः अग्निशमन, घनकचरा व्यवस्थापन (दैनंदिन स्वच्छता), सफाई सुरक्षा चॅलेंज, मलेरिया विभाग, एनयूएलएम, पीएम स्वनिधी प्रकल्प, महिला व बालकल्याण, निवडणूक, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास, आमदार स्थानिक धुळे शहर मूलभूत सोयी-सुविधा विकास योजना.
-उपायुक्त हेमंत निकम ः एलबीटी, घनकचरा व्यवस्थापन (कचरा डेपो/प्रोसेसिंग/डीपीआर/आयएचएचएल), माझी वसुंधरा, नगरोत्थान (राज्यस्तर), संगणक विभाग, आपले सरकार व पंतप्रधान पोर्टल यांचे नोडल अधिकारी, मूलभूत सोयी-सुविधा योजना (शहर आमदार वगळून), जाहिरात विभाग.
-उपायुक्त शोभा बाविस्कर ः सामान्य प्रशासन (आस्थापना), विधी, मागासवर्ग कक्ष, नगरोत्थान (जिल्हास्तर), दलितवस्ती/दलितेतर योजना, पर्यटन/तीर्थक्षेत्र विकास, शासकीय योजनांना कुंपण भिंती, रस्ता अनुदान, जनगणना, आरोग्य (वैद्यकीय), मनपा शिक्षण मंडळ, दिव्यांग कल्याण विभाग.
-सहाय्यक आयुक्त समीर शेख ः अल्पसंख्याक विभाग, खासदार निधी, आमदार निधी, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, अतिक्रमण (अनधिकृत बांधकाम), मोटरवाहन, भांडार, वृक्ष प्राधिकरण व उद्यान, अभिलेख, नागरी सुविधा केंद्र.
-प्रभारी शहर अभियंता कैलास शिंदे ः पाणीपुरवठा विभागाचे सर्व प्रोजेक्ट, विद्युत विभाग, सर्व शासकीय प्रकल्प, वाहतूक व्यवस्थापन, बांधकाम विभाग.
-कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) नवनीत सोनवणे ः पाणीपुरवठा विभागाचे सर्व प्रोजेक्ट्स, पाणीपुरवठा विभाग (दैनंदिन देखभाल), सर्व शासकीय प्रोजेक्ट (अमृत-१, २).
-नगररचनाकार विनोद मोरे ः एक हजार ५०० स्क्वेअर फूट मर्यादेपेक्षा जास्त बांधकाम परवानगी प्रकरणे, भाग नकाशे रेखांकन प्रकरणे/गुंठेवारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.