Preparations underway at Sri Vitthal temple site on Malegaon Road.
Preparations underway at Sri Vitthal temple site on Malegaon Road.esakal

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त प्राचीन विठ्ठल मंदिर सजले; धुळ्यात वाहतूक वळविली

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी बुधवारी (ता. १७) यात्रोत्सव व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
Published on

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी बुधवारी (ता. १७) यात्रोत्सव व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शहरातील मालेगाव रोड भागातील प्राचीन श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले. भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेत शहरातील अग्रेसन पुतळा ते दसेरा मैदानकडे जाणारा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बुधवारी पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत बंद राहील. (Ancient Vitthal temple decoration on Ashadhi Ekadashi )

शहरातील मालेगाव रोड भागात प्राचीन श्री विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराची १९६६ पूर्वी स्थापना झाली. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. मात्र, आषाढी एकादशीला विशेष महत्त्व असल्याने या दिवशी मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. प्राचीन विठ्ठल मंदिरात धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पहाटे विठुरायाची विधिवत पूजा येईल. नंतर मंदिर भाविकांसाठी खुले होईल. (latest marathi news)

Preparations underway at Sri Vitthal temple site on Malegaon Road.
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीमुळे आंबे विक्रीत दुपटीने वाढ

पाळणे दाखल

नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिराची ओळख आहे. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच भाविकांसाठी दर्शन आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विविध व्यवसायिकांनी या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. मंदिर परिसरातील तयारी पूर्ण झाली आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे, यासाठी बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. मंदिर परिसरात मनोरंजनासाठी पाळणे दाखल झाले आहेत. मंदिरावर रोषणाई झाली आहे.

वाहतूक मार्गात बदल

मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक नियंत्रणासाठी शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी ठराविक वेळेत तात्पुरते बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निर्गमित केली आहे. मंदिरस्थळी यात्रोत्सवनिमित्त शहरातील अग्रेसन पुतळा ते दसेरा मैदानकडे जाणारा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बुधवारी पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत बंद राहील. या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक अग्रेसन पुतळा, ऐंशीफुटी रोड, रेल्वे स्टेशन रोडमार्गे, दसेरा मैदान, अशी वळविल्याचे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले.

Preparations underway at Sri Vitthal temple site on Malegaon Road.
Ashadhi Ekadashi 2024 : पांडुरंगाला प्रिय असलेल्या तुळशीच्या हाराचे काय आहे महत्व?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.