Dhule News : लक्षांकापेक्षा अधिक 63 कोटींचा निधी वाटप; धुळे व नंदुरबार जिल्हा बँक

Dhule : धुळे व नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्व-निधीतून एकूण ३२५ कोटींच्या निधीचे कर्ज वाटप केले.
Dhule and Nandurbar District Bank
Dhule and Nandurbar District Bankesakal
Updated on

Dhule News : धुळे व नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्व-निधीतून एकूण ३२५ कोटींच्या निधीचे कर्ज वाटप केले. यात निर्धारित लक्षांकापेक्षा अधिक ६३ कोटींचा निधी वाटप झाला. त्यामुळे नवीन आणि वंचित सभासद शेतकऱ्यांना स्व- निधीअभावी कर्जवाटप करणे गैरसोयीसह अडचणीचे झाले आहे. हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शिखर बँकेकडून उचल मंजुरीसंदर्भात अटी-शर्ती शिथिल कराव्यात, अशी मागणी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी केली. (Dhule and Nandurbar District Bank disbursed 63 crore funding )

कदमबांडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि मागणीचे निवेदन दिले. त्यानुसार धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून खरीप हंगामासाठी नवीन व वंचित सभासदांची जिल्हा बँकेकडे सतत पीक कर्जाची मागणी होत आहे. बँकेने आजअखेर स्व-निधीतून एकूण ३२५ कोटींचे कर्ज निर्धारित लक्षांकापेक्षा ६३ कोटींनी जास्त वाटप केले आहे. परिणामी, नवीन व वंचित सभासद शेतकऱ्यांना स्वनिधीअभावी कर्जवाटप करणे अडचणीचे व गैरसोयीचे झाले आहे.

यादृष्टीने राज्य शिखर बँकेकडून उचल मंजूर करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. यात उचल रकमेवरील व्याजाचा दर व त्यापोटी संबंधित बँकेकडे करायची गुंतवणूक या अटी-शर्ती शिथिल कराव्यात, अशी मागणी आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार सचिवांना उचित कार्यवाहीची सूचना दिली. राज्य शिखर बँकेकडून निधी उपलब्ध झाल्यावर नवीन व वंचित सभासदांना पीक कर्ज वाटप केले जाईल, असे बँकेचे अध्यक्ष कदमबांडे यांनी फडणवीस यांच्या भेटीनंतर सांगितले.

पीक कर्जवाटपात उच्चांक

तत्पूर्वी, कदमबांडे, सीईओ धीरज चौधरी यांनी सांगितले, की यंदा खरीप हंगामात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन्ही जिल्ह्यात शेती पीक कर्ज वाटपात उच्चांक गाठला आहे. सर्व बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेने एक एप्रिल ते ११ जूनअखेर पीक कर्ज वितरणात उच्चांक प्रस्थापित केला. जिल्हास्तरीय समितीकडून मिळालेल्या लक्षांकापेक्षा ५६ कोटींचे, वीस जूनअखेर ६३ कोटींचे अधिक पीक कर्ज वाटप केले आहे.(latest marathi news)

Dhule and Nandurbar District Bank
Dhule News : ‘अक्कलपाड्या’त लवकरच शंभर टक्के जलसाठा : डॉ. सुभाष भामरे

जिल्हानिहाय स्थिती

धुळे जिल्ह्यात जिल्हा बँकेला १४९ कोटी कर्ज वाटपाचा लक्षांक देण्यात आला. पैकी १८ हजार २१६ सभासदांना १९२ कोटींचे कर्जवाटप केले. लक्षांकापेक्षा हे प्रमाण ४३ कोटींनी अधिक (१२८ टक्के) आहे. नंदुरबार जिल्ह्यात ११३ कोटींच्या कर्ज वाटपाचे लक्षांक होते. पैकी आठ हजार ९०७ सभासदांना १२६ कोटींचे कर्जवाटप केले.

अर्थात १३ कोटींनी अधिक (१११ टक्के) कर्ज वाटप झाले. बँकेला धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून २६२ कोटी कर्ज वाटपाचा लक्षांक होता. प्रत्यक्षात बँकेने दोन्ही जिल्ह्यात ३२५ कोटींचे कर्जवाटप केले. दोन्ही जिल्ह्यात एकूण २७ हजार १२३ शेतकऱ्यांना अकरा जूनअखेर ३१८ कोटींचे कर्जवाटप केले होते.

बँकेला मार्चअखेर नियमित वसुली दिलेल्या सर्व सभासद तसेच कर्जवाटपावेळी प्रत्यक्ष वसुली दिलेल्या सभासदांना कर्जवाटप पूर्ण झाले आहे. पीककर्ज वाटप लक्षांकाची साध्यता ही बँकेचे अध्यक्ष कदमबांडे, संचालक मंडळाचे सकारात्मक धोरण, अचूक नियोजन व नियंत्रणामुळे शक्य झाल्याचे चौधरी यांनी सांगितले.

Dhule and Nandurbar District Bank
Dhule News : 5 रुपयांत मिळते 18 लिटर थंड व शुद्ध पाणी; फिल्टर प्लान्टमुळे विविध गावांतील ग्रामस्थ तृप्त

आधारकार्ड अपडेटसाठी आवाहन

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कर्जदार शेतकरी सभासद, प्राथमिक विविध कार्यकारी व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना जिल्हा बँकेने आवाहन केले आहे, की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्जदारांसाठी प्रती अर्ज केवळ एक रुपयात पीक विमा पोर्टलवर नोंद करून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ राबविण्याचा निर्णय झाला आहे. पीक योजना अर्ज भरण्यासाठी केंद्र शासनामार्फत आधारकार्ड अपडेट असणे सक्तीचे केले आहे.

त्यामुळे ३० जूनपर्यंत जवळच्या सीएससी (CSC) सेंटरवर आधारकार्ड नेऊन पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड नंबर असल्यास त्यासह आधारकार्ड अपडेट करावे. आधारकार्ड अपडेट नसल्यास पीक विम्याचा अर्ज जिल्हा बँकेमार्फत केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरता येणार नाही. सभासदांनी ३० जूनपर्यंत आधारकार्ड अपडेट करून कर्ज घेतलेल्या जिल्हा बँक शाखेत आधारकार्डची झेरॉक्स प्रत जमा करावी व पीक विमा अर्ज भरावा.

''धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने ठरलेल्या लक्षांकापेक्षा दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीचे पीककर्ज वितरित केले आहे. या व्यतिरिक्त नवीन व वंचित शेतकरी सभासदांकडून पीक कर्जाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे शासनाने बँकेला पीक कर्जासाठी विशेष वित्तसहाय्य द्यावे, ही आग्रही मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत केली आहे.''- राजवर्धन कदमबांडे, अध्यक्ष, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक

Dhule and Nandurbar District Bank
Dhule Crime News : अमली पदार्थ तस्करी प्रकरणी 29 अटकेत; दाखल 21 गुन्ह्यात 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.