Dhule Bribe Crime : लाचखोर वरिष्ठ लिपिकास पकडले; निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाची तक्रार

Bribe Crime : पोलिस उपनिरीक्षकाकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना पोलिस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेच्या वरिष्ठ लिपिकाला पथकाने अटक केली.
Sunil Gavit
Sunil Gavitesakal
Updated on

Dhule Bribe Crime : निवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना पोलिस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेच्या वरिष्ठ लिपिकाला पथकाने अटक केली. सुनील वसंत गावित असे लाचखोराचे नाव आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. २) दुपारी ही कारवाई केली. संशयित गावित याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (arrest senior clerk of accounts branch in office of Superintendent of Police while accepting bribe )

तक्रारदार येथील पोलिस दलातून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावरून २०१९ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी शिल्लक काही बिले मंजुरीसाठी १० जुलैला येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्ज केला. पैकी तक्रारदाराचे एक लाख २९ हजार ८८८ रुपयांचे बिल त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. नंतर तक्रारदाराने उर्वरित बिलांबाबत वरिष्ठ लिपिक गावित याची भेट घेतली.

Sunil Gavit
Dhule Bribe Crime : लाचखोर तलाठी, कोतवालासह तिघांविरूध्द निजामपूरला गुन्हा; शेतीची खातेफोड अंगलट

तेव्हा गावित याने तक्रारदाराकडे त्यांना अदा केलेल्या बिलांच्या मोबदल्यात आणि प्रलंबित बिले काढून देण्याकामी जिल्हा कोशागार कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या नावाने दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. तशी तक्रार तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी केली. पडताळणीत तक्रारीत तथ्य आढळल्याने कोशागार कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या नावाने दोन हजारांची लाच स्वीकारताना गावित याला पथकाने पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रीय अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Sunil Gavit
Dhule Bribe Crime : जप्त ट्रॅक्टर सोडविण्यासाठी लाच घेणारा शिपाई जाळ्यात! धुळे शहर अपर तहसील कार्यालयातील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.