धुळे : विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकूण ५६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील एक हजार ७५३ केंद्रावर बुधवारी (ता. २०) मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यात जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला. जिल्ह्यात एकूण १८ लाख ३१ हजार ३२६ मतदार आहेत.