Dhule Bribe Crime : ‘पीएसआय’ दुसऱ्यांदा ‘ACB’च्या जाळ्यात; 40 हजारांची लाच

Dhule Bribe Crime : एका लाचखोरी प्रकरणात २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा झालेली असताना येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पुन्हा ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी गुरुवारी (ता. २९) अटक झाली.
Arif Syed
Arif Syed esakal
Updated on

Dhule Bribe Crime : एका लाचखोरी प्रकरणात २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा झालेली असताना येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पुन्हा ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी गुरुवारी (ता. २९) अटक झाली. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला गुरुवारी सकाळी ४० हजारांची लाच घेताना पकडले.

तक्रारदाराच्या चुलत भावाचे २२ ऑगस्ट २०२१ ला अपघाती निधन झाले. चुलत भावाने त्याच्या हयातीत एचडीएफसी अ‍ॅग्रो या वीमा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेतली. (Dhule Assistant Police Sub Inspector arrested again in connection with bribe)

चुलत भावाच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने पॉलिसीची रक्कम वारसांच्या नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे केली. त्यामुळे आझादनगर पोलिसात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद याच्याकडे होता.

या फसवणुकीच्या गुन्ह्यातील दुसऱ्याच्या नावे जमा झालेली व नंतर गोठविण्यात आलेली विम्याची रक्कम वारसांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तक्रारदाराच्या वहिनीने न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरून न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्यासाठी तपास अधिकारी उपनिरीक्षक आरिफ सय्यद याने तक्रारदाराकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर तक्रारदाराने २७ फेब्रुवारी २०२४ ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात तथ्य आढळल्याने पथकाने येथील पारोळा रोडवरील एका पान शॉपजवळ उपनिरीक्षक आरिफ सय्यदला तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. (latest marathi news)

Arif Syed
Jalgaon Bribe Crime : विद्युत निरीक्षकाच्या झाडाझडतीत लाखोंचे ‘घबाड’; लाचप्रकरणी कारवाई

त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नंतर त्यास अटक झाली. विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सय्यद पोलिस ठाण्याचा आरोपी सोनगीर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना २२ जुलै २०१० ला आरिफ सय्यदला ७० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात जिल्हा सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये लाचखोरी सिद्ध झाल्याने त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आले.

जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात आरिफ सय्यदने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यात त्याला २०१९ मध्ये दिलासा मिळाल्याने तो पुन्हा पोलिस खात्यात रुजू झाला, आता तो दुसऱ्यांदा लाचखोरी प्रकरणात सापडला आहे.

Arif Syed
Nandurbar Bribe Crime : सरपंचांसह कृषी अधिकाऱ्याला नवापुरात लाच घेताना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.