Dhule Bazar Samiti Election Result : येथील बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष समर्थित पॅनलने स्पष्ट बहुमत संपादन केले असून प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या पॅनलला खाते उघडण्यातही अपयश आले.
सर्व १८ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. (Dhule Bazar Samiti Election Result Amrishbhai charisma to Shirpur Winning all 18 seats news)
भारतीय जनता पक्षाला शिरपूर बाजार समिती काबीज करण्यात प्रथमच यश मिळाले आहे. १९९० पासून आमदार पटेल यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येथील सत्ता राखल्याचा इतिहास आहे. यापूर्वी २०१६ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस समर्थकांनी बाजार समितीवर सत्ता मिळवली.
२०१९ मध्ये आमदार पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांनी भाजपसाठी लढवली. त्यातही सर्व जागा पटकावून त्यांनी स्वत:चे वर्चस्व दाखवून दिले आहे.
येथील बाजार समितीच्या आरकेव्हीवाय गुदामात सायंकाळी पाचपासून मतमोजणीला सुरवात झाली. तहसीलदार महेंद्र माळी, मुख्य निवडणूक अधिकारी मनोज चौधरी, निवडणूक अधिकारी व्ही. बी. पापुलवाड, सहायक अधिकारी बी. एम. दुसाने, संजय ऐंडाइत, एस. एस. साळी, अमोल ऐंडाइत उपस्थित होते.
व्यापारी मतदारसंघाच्या रुपाने पहिला तर विविध कार्यकारी संस्थेच्या रुपाने अखेरचा निकाल हाती आला. प्रत्येक विजयाच्या उद्घोषणेनंतर मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित आमदार पटेल समर्थकांनी मोठा जल्लोष करीत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी संबंधितांना विजयी मिरवणूक न काढण्याची तंबी दिली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार
सोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण (सात जागा) : किरण गुजराथी, शांतीलाल जमादार, अरविंददास पाटील, कांतीलाल पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील, विठोबा महाजन.
सोसायटी महिला मतदारसंघ (दोन जागा) : मेघा पाटील, मनीषा मराठे
सोसायटी इतर मागास प्रवर्ग (एक जागा) : प्रसाद पाटील
सोसायटी अनुसूचित जमाती (एक जागा) : कृष्णा पावरा
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ (दोन जागा) : लक्ष्मीकांत पाटील, आनंदसिंह राऊळ.
ग्रामपंचायत अनुसूचित जाती ः जमाती (एक जागा) : जगन पावरा
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक (एक जागा) : मिलिंद बोरसे- पाटील
व्यापारी मतदारसंघ (दोन जागा) : अर्पित अग्रवाल, सतीश जैन.
हमाल-मापाडी मतदारसंघ (एक जागा) : किरण कढरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.