Dhule Vidhan Sabha Election 2024 : साक्री मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच लक्षवेधी; भाजपच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीत ज्या जागा लढविल्या, त्याच जागांवर यंदा आपली ताकद अजमावण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
Dhule Vidhan Sabha Election
Dhule Vidhan Sabha Electionesakal
Updated on

धुळे : गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागा लढविल्या, त्याच जागांवर यंदा आपली ताकद अजमावण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. हे सूत्र कायम राहिले, तर साक्री मतदारसंघ भाजपकडे द्यावा, अशी या पक्षाची आग्रही मागणी असेल. जर तसे झाले तर शिवसेनेशी (शिंदे गट) संलग्न झालेल्या साक्री मतदारसंघाचे आमदार भाजपवासी होऊन उमेदवारी करतील का?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याच मुद्द्याच्या आधारे धुळे शहराची जागा भाजपने राखावी, अशी धारणा इच्छुकांची असेल तर त्यात वावगे काही नाही. (before Sakri Constituency election everyone attention is on striking BJP move )

या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजप वरचढ ठरू शकणार आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी शिरपूर, साक्री, शिंदखेडा, धुळे ग्रामीण, अशा चार जागा लढण्याचे श्रेय भाजपला मिळू शकते. अशी खेळी खेळण्यात भाजपची कोअर कमिटी यशस्वी झाली तर भाजप पक्ष सोबत असणाऱ्यांची कोंडी करतो, हा विरोधी पक्षाचा आवाज कणखर होईल, असे अनुमान राजकीय विश्‍लेषक काढत आहेत.

जागा हातून निसटल्या

जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीत शिवसेनेला धुळे शहरासह साक्री, तर भाजपला धुळे ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूरची जागा बहाल झाली आहे. धुळे शहरातील जागा आपल्याच वाटेला येईल, असे ठाम मानून भाजपच्या इच्छुकांनी दोन महिन्यांपासून तयारीला वेग दिला. प्रत्यक्षात ही जागा आता शिवसेनेला मिळाली आहे. शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांच्यासाठी साक्री मतदारसंघ संरक्षित करण्यात आला आहे. या दोन्ही मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांमध्ये जागा हातून निसटल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. (latest marathi news)

Dhule Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

सूत्र अन्‌ वाटाघाटी

गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागा लढविल्या, त्याच जागांवर यंदा आपली ताकद अजमावण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. हे सूत्र कायम राहिले, तर साक्री मतदारसंघ भाजपकडे द्यावा, अशी या पक्षाची आग्रही मागणी असेल. त्याचे कारण गेल्या निवडणुकीत धुळे शहरात भाजपशी युती असताना शिवसेनेचे हिलाल माळी, तर साक्री मतदारसंघात भाजपकडून मोहन सूर्यवंशी यांनी निवडणूक लढविली होती.

मात्र, त्या वेळी साक्रीत भाजपच्या मंजुळा गावित यांनी बंडखोरीतून निवडणूक लढविली आणि अपक्ष म्हणून विजय मिळविला. त्यांनी नुकताच शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला आहे. त्यामुळे साक्री मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडावा आणि धुळे शहराची जागा भाजपला मिळावी, अशा आग्रहातून वाटाघाटी झाल्या तर भाजपला उमेदवारीची संधी चालून येऊ शकेल, असे कार्यकर्त्यांना वाटते.

रविवारी खलबते अन्‌ अपेक्षा...

विधानसभा निवडणुकीतील धुळे शहर आणि साक्री मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाटेला गेल्याने भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. धुळे शहराची जागा भाजपच्या वाटेला येण्याचे सध्या तरी कुठलेही चिन्ह नसले तरी रविवारी (ता. ६) वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या खलबतांमध्ये या जागेविषयी फेरनिर्णयाची, तसेच जागा वाटपासंबंधी आग्रही वाटाघाटीतून धुळे शहराची जागा भाजपकडे खेचून आणण्यासाठी नेत्यांकडून शिकस्त व्हावी, अशी आस कार्यकर्ते बाळगून आहेत.

Dhule Vidhan Sabha Election
Dhule Vidhan Sabha Election 2024: धुळे शहराची जागा शिवसेना शिंदे गटाला! भाजपच्या गोटात चिंता; विविध समीकरणे बदलण्याची चिन्हे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.