चिमठाणे : केंद्र व महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृपादृष्टी असल्याने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ सर्वांगीण विकासाकडे झेपावत आहे. यात मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यात नरडाणा (ता. शिंदखेडा) सर्वांत मोठे रेल्वेस्थानक होणार आहे, असा विश्वास व्यक्त करत माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी फडणवीस यांच्याकडे विविध मागण्या केल्या. (biggest railway station Nardana MLA Rawal statement)