चिमठाणे : महात्मा जोतिराव कर्जमाफी प्रोत्साहन योजनेतील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफीचे पोर्टल चालू केले असून, १२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र शासनातर्फे पुन्हा मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. शिंदखेडा तहसील कार्यालयाला पोर्टलसाठी याआधी दिलेला लॉगीन पासवर्ड वापरताना एरर येत असून, मंत्रालयाकडून आदेश देऊन एक महिना झाला तरी नव्याने युजर पासवर्ड दिला नसल्याने शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Borrowers do not get login password Farmers of Shindkheda taluka will miss loan waiver)
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण न केलेल्या राज्यातील ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा १२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली होती. या कालावधीत १८ हजार १६३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून, अद्याप १५ हजार १९३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे.
या शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रोत्साहन रकमेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची नावे शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, बचत खाते क्रमांक, कर्ज रक्कम, नाव, तसेच लाभार्थी शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण करताना बायोमेट्रिक मशिनवर हाताचा ठसा न येणे आदी बाबी जुळत नसतील तर तहसीलदार यांचे पोर्टलवर तक्रार जाते. (latest maratahi news)
शेतकऱ्याने नंतर तहसील कार्यालयात स्वत: उपस्थित राहून सदर तक्रारी पुढे शासनाकडे दुरुस्तीसाठी पाठविले जातात. तत्कालीन तहसीलदार सुनील सैदाणे यांचा लॉगीन पासवर्ड होता. मात्र नवीन तहसीलदार अनिल गवांदे यांचा लॉगीन पासवर्ड नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी लाभापासून वंचित राहतात की काय, शिंदखेडा तहसील कार्यालयाला अद्याप लॉगीन पासवर्ड मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना वारवांर तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. लाभार्थी शेतकरी यांना तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.
''महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा एखाद्या शेतकरीचे आधार प्रमाणीकरण होत नसल्यास त्या शेतकऱ्याला ओळखतो म्हणून थम्स देऊन ॲप्रुवल दिले जाते. फार कमी प्रमाणात यासाठी शेतकरी येतात. इतर सर्व सहकार विभागाचे काम आहे.''- अनिल गवांदे, तहसीलदार शिंदखेडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.