Dhule News : पूल अन् रस्त्यांची कामे फलकांविनाच सुरू! वाहनधारकांना त्रास

Dhule : पाच ठिकाणी मोठ्या पुलांचे काम सुरू आहे, तर धनेरपासून पुढे आमळी, चौपाळेपर्यंत नुकतेच डांबरीकरण रस्त्याची कामे उरकली, तीही फलकांविना.
A heavy vehicle got stuck on the Kondaibari to Amli road near the nursery near Malangaon Dam, and the heavy vehicle stuck due to the dirt road collapsing as the alternative road was not paved.
A heavy vehicle got stuck on the Kondaibari to Amli road near the nursery near Malangaon Dam, and the heavy vehicle stuck due to the dirt road collapsing as the alternative road was not paved.esakal
Updated on

Dhule News : कोंडाईबारी ते आमळीदरम्यान रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून कोट्यवधी रुपये खर्चाच्या तब्बल पाच ठिकाणी मोठ्या पुलांचे काम सुरू आहे, तर धनेरपासून पुढे आमळी, चौपाळेपर्यंत नुकतेच डांबरीकरण रस्त्याची कामे उरकली, तीही फलकांविना. मोठ्या पुलांसाठी व रस्त्यांसाठी झालेली तरतूद, अंदाजपत्रक तसेच कोंडाईबारी-आमळी रस्त्यावर ठिकठिकाणी व कान नदीवर सुरू असलेल्या पुलाचे व रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी माहितीचा फलक लावणे बंधनकारक असताना अशा एकाही कामावर कोणतेही माहितीफलक नाहीत.(Bridge and road works continue without signposts causing )

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचेही लक्ष नसल्याने नागरिकांना काहीच बोध होत नाही. त्यामुळे सर्व सुरू असलेल्या कामांवर माहितीफलक लावावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, सुरू असलेल्या पुलांचे व नुकतेच झालेले डांबरीकरण रस्त्याचे काम कोणत्या ठेकेदाराने केले, त्यासाठी किती खर्च आला, रस्त्याचे किती लेअर आहेत, रस्त्याचे किती किलोमीटरपर्यंत काम आहे, त्याची मुदत किती आहे, काम पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे या संपूर्ण बाबींचा फलक नागरिकांच्या माहितीसाठी लावणे गरजेचे असताना एकाही कामावर असे माहितीफलक लावण्याचे कष्ट ना ठेकेदाराने घेतले ना प्रशासकीय यंत्रणेला त्याचे काही सोयरसुतक असते.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा येत आहे. बहुतांश ठिकाणी डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी गटार न काढल्यामुळे पावसाचे पाणी थेट ते रस्त्यावर आले आहे. पाण्याबरोबर माती व खडी बऱ्याच ठिकाणी वाहून आलेली आहे. त्यामुळे कुठली कामे पूर्ण झाली आहेत. याबाबतची माहिती नागरिकांना समजायला मार्गच नसतो. हे काम कुठल्या विभागाने केले. ते सर्वप्रथम देणे बंधनकारक असताना ही लपवाछपवी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुलांचे काम ठेकेदारांकडून नियोजनबद्ध पद्धतीने करणे अपेक्षित असताना पुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी पर्यायी रस्ता पाइप टाकून न करता नाल्यामधूनच माती पसरवून तसाच पर्यायी रस्ता काढण्यात आलेला आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने जाऊन पर्यायी रस्ता काही ठिकाणी खचल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळित होते, तर अवजड वाहने अडकून पडतात. त्यामुळे वाहनचालकांना दररोज कसरत करून चिखलातून प्रवास करावा लागत आहे. (latest marathi news)

A heavy vehicle got stuck on the Kondaibari to Amli road near the nursery near Malangaon Dam, and the heavy vehicle stuck due to the dirt road collapsing as the alternative road was not paved.
Dhule News : गोपीनाथ मुंडे अपघात योजना अनुदान वाटपात दिरंगाई : आमदार कुणाल पाटील; तत्काळ निधीची मागणी

बर्डीपाडा, मालनगाव धरणाजवळील रोपवाटिकेजवळ व डुकरीपाडा, जांभाळीजवळ पुलाचे संथगतीने काम सुरू असल्यामुळे वाहनचालकांना आता पावसामुळे ही कामे त्रासदायक ठरत आहेत. मालनगाव धरणाजवळील रोपवाटिकेजवळील पुलाजवळ कच्च्या पर्यायी रस्त्यावर नुकतेच अवजड वाहन चिखलात रुतल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही तास बंद झाली होती. ते वाहन क्रेनद्वारे काढावे लागले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

त्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत आहे. नवीन तयार झालेल्या डांबरीकरण रस्त्यावर असंख्य गतिरोधक टाकण्यात आलेले आहेत. त्यातील एकाही गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेकदा नवीन वाहनचालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती असते. या रस्त्यावरील सर्वच गतिरोधक पांढऱ्या पट्ट्यांविना आहेत. त्यामुळे संबंधित विभागाची कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकांऱ्याचा वचक नाही असे चित्र दिसते.

भाविकांसह प्रवाशांचा चिखलातून प्रवास

श्री कन्हय्यालाल महाराजांच्या दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी राज्यातील व लगतच्या गुजरातमधील भाविक मोठ्या संख्येने आमळीला येतात. त्यामुळे कोंडाईबारी-आमळी मार्गावर वाहनांची दररोज मोठी वर्दळ असते. त्यांना कोंडाईबारी ते आमळीपर्यंत ठिकठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळील पर्यायी रस्त्यावरील चिखलातून खड्ड्यातील पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे.

A heavy vehicle got stuck on the Kondaibari to Amli road near the nursery near Malangaon Dam, and the heavy vehicle stuck due to the dirt road collapsing as the alternative road was not paved.
Dhule News : मेंढपाळ बांधव, मेंढ्यासह रास्ता रोको! महिला, युवतीसह चिमुकल्यांचाही सहभाग; वाहतूक ठप्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.