Dhule News: कोंडाईबारी-आमळी मार्गावरील पुलांचे काम अर्धवट! वाहनचालक, भाविक त्रस्त; दोन कोटींतून पुलांची उभारणी

Dhule News : जोरदार पावसामुळे पाणी साचल्याने, चिखल झाल्याने वाहन चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. पुलाचे काम लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
Partially constructed bridge over deep and Ghosal drain on Kondaibari-Amli route. At present, the work of this bridge is closed, and as an alternative road has not been laid there, one has to travel through the mud through the potholes in the drain.
Partially constructed bridge over deep and Ghosal drain on Kondaibari-Amli route. At present, the work of this bridge is closed, and as an alternative road has not been laid there, one has to travel through the mud through the potholes in the drain.esakal
Updated on

आमळी : कोंडाईबारी ते आमळी मार्गावर तब्बल चार ठिकाणी मोठ्या पुलांचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये सततच्या होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी साचल्याने, चिखल झाल्याने वाहन चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. पुलाचे काम लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (Bridge work on Kondaibari Amli road incomplete)

बर्डीपाडा गावानजीक असलेल्या खोल तथा घोसळ नाल्यावरील पुलाचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून संथगतीने सुरू होते. तेही लवकर वेळेवर पूर्ण न केल्यामुळे गेल्या महिनाभरापासून काही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद असून, या पुलाजवळ पर्यायी रस्ता पाइप टाकून न केल्यामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहातून, चिखलातून कसरत करत वाहनचालकांना मार्गस्थ व्हावे लागत आहे. याकडे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे परिसरातील नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. वाहनधारकांमध्ये अपघाताची शक्यता बळावली आहे.

अवजड वाहनांना अडथळा

अर्धवट बांधकाम व सध्या काम बंद असलेल्या बर्डीपाडा गावाजवळील खोल तथा घोसळ नाल्यावरील पुलाचे बांधकाम ठेकेदाराने नोव्हेंबर २३ पासून सुरू केले. त्यानंतर कामाला गती देणे आवश्यक असताना संथगतीने काम केले जात होते. त्यातच गेल्या महिन्याभरापासून पुलाचे काम पूर्णपणे बंद आहे.

या पुलास तब्बल दोन कोटींची मंजुरी आहे. १५ मीटर लांब, ७ मीटरचे दोन गाळे आहेत. पुलाची उंची ७ मीटर, १० मीटर रुंदी आहे. पुलाच्या बांधकामापूर्वीच त्या ठिकाणी पर्यायी रस्ता पाइप टाकून करणे गरजेचे होते.

मात्र तसे न करता नाल्यामधूनच माती पसरवून तसाच पर्यायी रस्ता काढण्यात आलेला आहे. त्याचाही बराचसा भरावा वाहून गेलेला आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने जाऊन पर्यायी रस्ता काही ठिकाणी खचल्यासारखी स्थिती झाली आहे. अवजड व चार चाकी वाहने अडकून पडतात. दुचाकीही कशीतरी निघते. (latest marathi news)

Partially constructed bridge over deep and Ghosal drain on Kondaibari-Amli route. At present, the work of this bridge is closed, and as an alternative road has not been laid there, one has to travel through the mud through the potholes in the drain.
Dhule News: धुळे महापालिकेत प्रथमच ‘पथविक्रेता समिती’! समिती गठित करण्यात धुळे मनपा राज्यात दुसरी, नाशिक विभागात पहिली

दिशादर्शक फलक हवेत

पुलावर दोन्ही बाजूने मोठे दिशादर्शक फलकही लावले नसल्याने रात्री अंदाज येत नाही. संबंधित विभाग अपघात होण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मालनगाव धरणाजवळील रोपवाटिकेजवळ, डुकरीपाडा, जांभाळी, गावाजवळील नाल्यावरील पुलांचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे तेथेही चिखलमय झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना कसरत करून वाहने काढावी लागतात.

प्रवास धोकादायक

श्री कन्हयालाल महाराजांच्या दर्शनासाठी राज्यासह मध्य प्रदेश, गुजरातमधील भाविक मोठ्या संख्येने आमळीला येतात. श्रावणात दर्शनासाठी अधिक गर्दी असते. याशिवाय निसर्गरम्य अलालदरीचा परिसर, मालनगाव, काबऱ्याखडक धरणाकडे जाण्यासाठी हाच महत्त्वपूर्ण रस्ता आहे.

त्यामुळे कोंडाईबारी-आमळी मार्गावर वाहनांची दररोज मोठी वर्दळ असते. शैक्षणिक सहली येतात; परंतु ठिकठिकाणी सुरू असलेल्या अर्धवट पुलाच्या कामांमुळे तर पर्यायी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या रस्त्याने प्रवास करणे मोठे जिकिरीचे ठरत आहे.

Partially constructed bridge over deep and Ghosal drain on Kondaibari-Amli route. At present, the work of this bridge is closed, and as an alternative road has not been laid there, one has to travel through the mud through the potholes in the drain.
Dhule News : तापी जलवाहिनीला 17 ठिकाणी गळती! 8 ऑगस्टला दुरुस्ती; एक दिवस उशिरा पाणीपुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.