Dhule News : ‘एलसीबी’कडून घरफोड्याला अटक; विटाभट्टीतून ताब्यात

Dhule : देवपूरमधील घरफोडीचा समांतर तपास करीत एलसीबीच्या पथकाने देवपूर भागातील अट्टल घरफोड्याला बेड्या ठोकल्या आहेत.
Item seized by LCB.
Item seized by LCB.esakal
Updated on

Dhule News : देवपूरमधील घरफोडीचा समांतर तपास करीत एलसीबीच्या पथकाने देवपूर भागातील अट्टल घरफोड्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ११ हजार ४०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

देवपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना या घरफोडीचे धागेदोरे मिळाले. (Burglar arrested by LCB)

Item seized by LCB.
Dhule News : शाळेसाठी विद्यार्थ्यांची दहा किमी पायपीट; हिसपूर-आच्छीची पाच वर्षांपासून स्थिती

हा गुन्हा जयवंत बापू पाटील (वय १९, रा. विटाभट्टी, हनुमान मंदिराजवळ, देवपूर) याने केल्याची माहिती एलसीबीला मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने जयवंत पाटील याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.

या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेला ११ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे.

उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, कैलास दामोदर, संजय पाटील, श्याम निकम, संतोष हिरे, चेतन बोरसे, मुकेश वाघ, पंकज खैरमोडे, प्रकाश सोनार, शशिकांत देवरे, हर्शल चौधरी, जितेंद्र वाघ, महेंद्र सपकाळ, गुणवंत पाटील यांनी केली.

Item seized by LCB.
Dhule News : मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्या; गायकवाड यांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.