Dhule Crime News : शहरालगत नगावला चोरट्यांचा रात्रभर धुमाकूळ; 6 ठिकाणी घरफोडी सत्र

Dhule Crime : चोरट्यांनी धुळे शहरालगत नगाव येथे मंगळवारी (ता.१८) मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घातला.
A house cleaned by thieves.
A house cleaned by thieves.esakal
Updated on

Dhule Crime News : चोरट्यांनी धुळे शहरालगत नगाव येथे मंगळवारी (ता.१८) मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घातला. त्यांनी एकाच रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी करीत पोलिसांना आव्हान दिले. दोन ठिकाणी अडीच लाखांच्या दागिन्यांसह रोकड, तर साक्री शहरातही मुकुंद नगरात मंगळवारी भरदिवसा रोकडसह ५२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नगाव घटनेप्रमाणे पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात दुपारनंतरही गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ()

नगाव येथील शेतकरी जिजाबराव पंडित पाटील हे कुटुंबीयांसह घराच्या छतावर झोपले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील एक तोळ्याची सोन्याची चैन, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, अडीच भार चांदीचे दागिने नेले. नंतर चोरट्यांनी होळी चौक परिसरातील रोहित संजय पाटील यांच्या माऊली निवासकडे (घर नंबर ४८७) मोर्चा वळविला. त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटातून पंधरा ग्रॅमची सोन्याची माळ, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, तीन भार चांदीचे ब्रेसलेट, चांदीची लक्ष्मी, असा ऐवज लंपास केला.

गस्त वाढविण्याची मागणी

गावातील भिका सीताराम पाटील, अशोक महादेव पाटील, राजेंद्र लक्ष्मण पाटील व राजेंद्र पंडित भदाणे यांच्याकडेही चोरीचा प्रयत्न झाला. घटनेची माहिती मिळताच पश्‍चिम पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्‍वानाने काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढला. ग्रामस्थांनी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली. नगाव येथे चोरट्यांनी एकाच रात्रीतून सहा ठिकाणी घरफोडी केल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी पोलिसांना तपासाचे आव्हान दिले आहे.

A house cleaned by thieves.
Dhule Crime News : सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडेचार लाखांवर डल्ला; अमराळे येथे 2 ठिकाणी घरफोडी

साक्रीत धाडसी घरफोडी

साक्री शहरातील मुकुंद नगरात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी घरफोडी केली. रोकडसह ५२ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी साक्रीत गुन्हा दाखल झाला. मुकुंद नगरातील प्लॉट क्रमांक अकरामध्ये वास्तव्यास असलेले करामत अली बशीर अली सय्यद (वय ३८) हे मंगळवारी (ता.१८) सकाळी साडेदहाला घर बंद करून बाहेर पडले.

सायंकाळी पाचच्यादरम्यान चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्याने ४१ हजारांची रोकड व सहा हजार ४०० रुपयांची एक ग्रॅमची सोन्याची नथ, एक हजार २०० रुपयांच्या चांदीच्या दोन अंगठ्या, अडीच हजारांचे चांदीचे दोन पैंजण, एक हजारांच्या दोन मनगटी घड्याळ, मैत्रेय कंपनीचे ८० पॉलिसीधारकांची कागदपत्रे, असा एकूण ५२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल नेला.

A house cleaned by thieves.
Dhule Crime : पाण्याच्या बाटल्यांआड बनावट दारूची वाहतूक! LCB च्या कारवाईत साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.