धुळे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीकामी सुमारे पंधरा कोटींच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. यासंबंधी आदेश कार्यासन अधिकारी जयसेन इंगोल यांनी ८ ऑक्टोबरला काढला आहे. याकामी नागरी हक्क संरक्षण समितीने पाठपुरावा केल्याने ही फलश्रुती मिळाल्याचे समितीचे सरचिटणीस महेश घुगे यांनी सांगितले. (bus stand will change face of civil rights protection committee )
धुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणी करण्यासंदर्भात अंदाजपत्रकात फलाट, आस्थापनासह अधिकारी विश्रांतीगृह, चालक-वाहक, तसेच महिला चालक-वाहक कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, एसटी बँक व वेल्फेअर सेंटर आदी विकासात्मक कामांचा समावेश आहे.
समितीचा पाठपुरावा
धुळे मध्यवर्ती बसस्थानकाचा कायापालट व्हावा म्हणून गेल्या तीन वर्षांपासून नागरी हक्क संरक्षण समितीतर्फे राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठपुरावा सुरू होता. महामंडळ सकारात्मक होते. मात्र, शासनाकडून खर्चाला मंजुरी मिळत नव्हती. अखेर ८ ऑक्टोबरला शासनाने धुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे पंधरा कोटी खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.
प्रवाशांची गैरसोय
मध्यवर्ती बसथानक गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. कर्मचाऱ्यांबरोबर प्रवाशांनाही गैरसोय सहन करावी लागत असल्याने नागरी हक्क संरक्षण समितीतर्फे बसस्थानकाचा कायापालट व्हावा, यासाठी पाठपुरावा केला जात होता. त्याला अखेर यश आले. त्याबद्दल नागरी हक्क संरक्षण समितीतर्फे सरचिटणीस महेश घुगे यांनी शासनासह राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आभार मानले.
मान्यता घ्यावी
नमुना नकाशा, मांडणी नकाशा, तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजुरी घेऊन काम सुरू करावे. ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतुदींबाबत काम करताना विस्तृत अंदाजपत्रक करून कार्यकारी अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता घ्यावी, पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यवाही करावी, कामाच्या बांधकामाचा खर्च गृह विभागाच्या उपलब्ध नियत व्ययामधून करण्यात येईल आदी अटींची पूर्तता करून मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. (latest marathi news)
पुनर्बांधकामावर अपेक्षित खर्च
(बसस्थानक इमारतीसह रुपयांत)
तळमजला : सात कोटी १४ लाख
पहिला मजला : ८४ लाख
पाणीपुरवठा/सांडपाणीव्यवस्था : ३९ लाख ९० हजार
विद्युत काम इंटरनल : ३९ लाख ९० हजार
एक्ट्रनल : ४७ लाख ८८ हजार
फायर फायटिंग : ११ लाख ४० हजार
रेनवॉटर हारवेस्टिंग (आवश्यकतेनुसार) : एक लाख
काँक्रिटीकरण वाहनतळ (आवश्यकतेनुसार) : दोन कोटी ४० लाख १३ हजार
कामगार विमा (एक टक्का) : ११ लाख ७८ हजार ७२०
कॉन्टेजन्सी : ४७ लाख १२ हजार ८४०
मटेरिअल टेस्टिंग व रॉयल्टी : २३ लाख ५६ हजार ४२०
वस्तू व सेवा कर (१८ टक्के) : दोन कोटी १२ लाख सात हजार ७८०
वास्तुविशारद शुल्क (२ टक्के) : २३ लाख ५६ हजार ४२०
विकास शुल्क : तीन लाख ५० हजार
एकूण रक्कम : १४ कोटी ९९ लाख ९० हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.