Dhule Crime News : धुळ्यात पावणेतीन लाखांचा गांजा जप्त! एलसीबीच्या कारवाईत मध्य प्रदेशातील संशयिताला अटक

Dhule News : मालवण (ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथील एका तरुणास शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवर गांजा बाळगताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने ताब्यात घेतले.
LCB Police Inspector Shriram Pawar and his team of policemen after arresting the suspect who was in possession of ganja.
LCB Police Inspector Shriram Pawar and his team of policemen after arresting the suspect who was in possession of ganja.esakal
Updated on

Dhule News : मालवण (ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथील एका तरुणास शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवर गांजा बाळगताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख ७४ हजार ८०० रुपयांचा गांजा जप्त केला. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बबलू सखाराम खरते (वय ३३, रा. मध्य प्रदेश) हा गांजा बाळगून असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना सोमवारी (ता. २९) मिळाली. (Dhule Crime News)

त्या अनुषंगाने श्री. पवार यांनी पथकास कारवाईची सूचना दिली. पथकाने शहरातील चाळीसगाव चौफुली येथून संशयित बबलू खरते याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चार वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या पाकिटांमधील दोन लाख ७४ हजार ८०० रुपयांचा गांजा जप्त केला.

सदेसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार बबलू खरते याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे. (latest marathi news)

LCB Police Inspector Shriram Pawar and his team of policemen after arresting the suspect who was in possession of ganja.
Dhule Crime News : हरियानात जाऊन डेबिटकार्ड भामट्याच्या आवळल्या मुसक्या; शिरपूर शहर पोलिसांची कामगिरी

पोलिस उपअधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, श्रीकृष्ण पारधी, प्रकाश पाटील, अमित माळी, संजय पाटील, संदीप सरग, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, संदीप पाटील.

मायूस सोनवणे, तुषार सूर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील, अतुल निकम, जीवन बोरसे, शरद लेंढे, डी. एम. गवारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LCB Police Inspector Shriram Pawar and his team of policemen after arresting the suspect who was in possession of ganja.
Dhule Crime News : सराईत चोरट्यांना ‘मिनी मोक्का’; धुळ्यातील देवपूर पोलिसांकडून राज्यातील पहिली कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.