चिमठाणे : शिंदखेडा - साक्री राज्य मार्गावरील आरावे (ता. शिंदखेडा) गावशिवारातील जुन्या नाल्यावर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाचा अंदाज चालकास न आल्याने कार पुलावरून खाली नाल्यात पडून झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले.
मृतांमध्ये साक्री खरेदी विक्री संघाचे संचालक तथा इंदवे (ता.साक्री ) येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या लिपिक सजन पदमोर याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.२) रात्री हा अपघात झाला. (car overturned from bridge one person killed)
शुक्रवारी रात्री इंदवे येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे संस्थाचालक किरण पदमोर, लिपीक सज्जन पदमोर, त्यांचे मेहुणे तथा नंदुरबारचे महसूल मंडळ अधिकारी श्री. गर्दे व जितेंद्र सोनवणे हे कारने धुळ्याहून चिमठाणे मार्गे हट्टी (ता.साक्री) गावाकडे घरी परत जात असताना त्यांची कार चिमठाणे गावाच्या पुढे आरावे गावशिवारातील पुलाजवळ आली.
यावेळी कार चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून पाण्यात पडल्याने लिपिक सजन पदभोर (रा.हट्टी) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाल्याने धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (latest marathi news)
पुलाच्या बांधकामामुळे गेला जीव
सुकवद-हेरगाव फाटा या राज्य मार्गाचे रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून 'कासवगतीने' सुरू असल्याने लहान मोठे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदारावर कारवाई करीत नसल्याने वाहन चालक व रस्त्यालगत असलेल्या गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात सजन पदमोर यांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कारणीभूत असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.