Dhule News : पाण्याच्या गुणवत्तेनुसार ग्रामपंचायतींना कार्ड; धुळे जिल्ह्यात पावणेतीन हजार जलस्रोतांची तपासणी

Dhule News : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील दोन हजार ७८७ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे.
Water
Water esakal
Updated on

Dhule News : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील दोन हजार ७८७ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीअंती जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार त्या-त्या ग्रामपंचायतींना लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून ही मोहीम सुरू झाली असून, ३० एप्रिलपर्यंत ती पूर्ण होईल. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून दर वर्षी पावसाळ्याच्या आधी व पावसाळ्यानंतर अशी दोनदा जलस्रोतांची तपासणी केली जाते.(Dhule Card to village panchayats according to water quality)

त्यानुसार आता पावसाळ्यानंतरची तपासणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींमधील दोन हजार ७८७ जलस्रोतांची मोबाईल अ‍ॅपद्वारे तपासणी सुरू झाली. जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे १ एप्रिलपासून तालुकानिहाय पाणी गुणवत्ता तपासणी सुरू झाली. जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता मिशन कक्षामार्फत दर वर्षी जलस्रोतांच्या पाण्याची रासायनिक तपासणी करण्यात येते.

पाण्याचे नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीमार्फत संकलित केले जातात. त्या अनुषंगाने सर्वच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे म्हणजेच विहिरी, कूपनलिका आणि हातपंपाचे नमुने ग्रामसेवक.

आरोग्यसेवक व आरोग्य सहाय्यकांच्या सहकार्याने मोबाईल अ‍ॅपद्वारे गोळा करण्यात येणार आहेत. या पाणी नमुन्याची रासायनिक तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येत आहे. तसेच जलस्रोतांचा परिसर, पाणीपुरवठा योजनांची पाणी शुद्धीकरण प्रक्रिया याची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता निश्चित करणार आहेत. (latest marathi news)

Water
Dhule Water Scarcity : पाण्याअभावी फळबाग फुलली नाही; खानदेशात समृद्धी दर्शविणाऱ्या निकुंभेतील उलाढाल शून्यावर

त्या अनुषंगाने ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे आणि लाल कार्ड दिले जाणार आहे. ज्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाईल त्या ग्रामपंचायतीने पाणीस्रोतांची गुणवत्ता सुधारून हिरवे कार्ड मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असेल.

शुद्ध पाणीपुरवठ्याचा उद्देश

जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार ८२७ नळ पाणीपुरवठा योजनांचे स्रोत या मोहिमेंतर्गत तपासण्यात येणार आहेत. ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ग्रामीण भागात अनेक आजार हे अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे होतात.

यासाठी जलस्रोतांचे सर्वेक्षण महत्त्वाचे मानले जाते. या मोहिमेतून कोणत्या गावात ग्रामस्थांना कसे पाणी उपलब्ध होत आहे याची माहिती समोर येणार आहे. त्यानंतर पुढील उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे.

Water
Dhule Municipality News : थकबाकीदार 108 गाळेधारकांना अखेरची नोटीस, जप्तीचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.