Dhule Lok Sabha Code Of Conduct : आचारसंहितेचे उल्लंघन..! ‘सी-व्हिजिल’वर तक्रार करा

Dhule Lok Sabha Code Of Conduct : लोकसभा निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे.
cVIGIL app
cVIGIL appesakal
Updated on

Dhule Lok Sabha Code Of Conduct : लोकसभा निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल सिटिझन ॲप’ विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. (Dhule code of conduct)

पण, काही वेळा या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोचण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल ॲप विकसित केले आहे.

या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सी-व्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवाही घेता येणार आहे.

वैशिष्ट्य

सी-व्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. आचारसंहिता उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो. (latest marathi news)

cVIGIL app
Loksabha Election:महाविकास, महायुतीतील धुसफूस थांबेना; उमेदवारांबद्दल संभ्रम कायम, प्रचारासाठी मिळणार फक्त इतका कालावधी

वापर कसा करायचा

गुगल प्ले स्टोअर व आयफोनमधील ॲप स्टोअर या ॲपमध्ये जाऊन सी-व्हिजिल (cVIGIL) सर्च करा. त्यानंतर ॲप डाउनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करून खाते तयार करा.

तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

cVIGIL app
Loksabha Election 2024 : अमेठी, रायबरेलीतून राहुल, प्रियांका निवडणूक रिंगणात? ; काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेशातील यादी जाहीर

लाइव्ह फोटो, व्हिडिओ

या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाइव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात, जेणेकरून भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमूंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल. या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल.

डाटा सुरक्षित

या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

cVIGIL app
Dhule Lok Sabha Election : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ‘दारोदारी’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.