Dhule Crime News : धुळ्यात 137 जणांवर गुन्हा; संशयितांचे धरपकडसत्र सुरू

Dhule Crime : लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी सोमवारी (ता. २०) शहरातील गल्ली क्रमांक सहामधील नवभारत चौकात सायंकाळी झालेल्या दगडफेक प्रकरणी सुमारे १३७ जणांवर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
Crime
Crimeesakal
Updated on

Dhule Crime News : लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी सोमवारी (ता. २०) शहरातील गल्ली क्रमांक सहामधील नवभारत चौकात सायंकाळी झालेल्या दगडफेक प्रकरणी सुमारे १३७ जणांवर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी १२ संशयितांची ओळख पटवली. त्यांच्यासह इतरांचे धरपकडसत्र सुरू केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया २० मेस पार पडली. (case was registered against137 people in Azad Nagar)

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शहरातील गल्ली क्रमांक सहामधील मनपा शाळा क्रमांक नऊ येथील मतदान केंद्रात प्रवेश करताना मोबाईल बाहेर काढून घेतला. या रागातून संशयित जाहीद अहमद इकबाल अहमद, शकील बोरिंगवाला, इकबाल अन्सारी, ताशा गल्लीत कपाट बनविणारा महेफुज अन्सारी, जाहीद हकीम याचा मुलगा, अमीर (आरिफ पायलट याचा भाऊ), लल्लू हकीम याचा मुलगा, अरबाज अन्सारी, नदीम खाटीक, नहीम खाटीक, हासीम आबीद अन्सारी, नाफीज मुल्ल्या याचा मुलगा (सर्व रा. धुळे) व अन्य शंभर ते सव्वाशे जणांच्या जमावाने गल्ली क्रमांक सहामधील नवभारत चौकात येऊन घोषणाबाजी आणि दगडफेक केली.

Crime
Dhule Crime News : धुळे, नंदुरबार बनतेय लाचखोरांचे आगार! जिल्ह्यांना लागलीय भ्रष्टाचाराची किड

पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने वीज कंपनीच्या रोहित्राचे नुकसान करण्याच्या उद्देशाने डीपीवर दगडफेक केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत हवालदार योगेश शिरसाट यांच्या फिर्यादीवरून संशयित १२ जणांसह जमावावर विविध कलमान्वये आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Crime
Dhule Crime News : एचटीबीटी कापसाची 650 पाकिटे बियाणे जप्त; शिंदखेडा तालुक्यात कृषी विभागाची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.