गेल्या विधानसभा निवडणुकीत `एमआयएम`चे उमेदवार फारुक शाह यांनी विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत तेच उमेदवार असतील. परंतु, त्यांच्यासमोर प्रामुख्याने मुस्लीमबहुल व इतर भागातील मतविभाजनाचे आव्हान असेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत दहा उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजवर्धन कदमबांडे यांनी अपक्ष उमेदवारी केली.
त्यांना भाजपचा छुपा (?) पाठिंबा होता. शिवाय लोकसंग्राम पक्षातर्फे अनिल गोटे, भाजपशी युती असताना शिवसेनेतर्फे हिलाल माळी रिंगणात होते. पडद्यामागील दगाफटक्यामुळे श्री. कदमबांडे यांचा, तसेच श्री. गोटे, श्री. माळी यांचाही पराभव झाला. यात आमदारकीची माळ शाह यांच्या गळ्यात पडली. त्यांनी मुस्लीमबहुल व इतर भागात विकासकामांचा धडाका लावला. (Dhule City Assembly Election 2024 real challenge of vote splitting tactics)