Clean Survey 2023 : सुधारणा की घसरण हा प्रश्‍न; कचरामुक्तीतही 3-स्टार मानांकन

धुळे शहर देशात ५७, राज्यात १२ व्या स्थानी स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ च्या निकालात महाराष्ट्राने देशपातळीवर नावलौकिक मिळविला.
dhule municipal corporation
dhule municipal corporation esakal
Updated on

Clean Survey 2023 : स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ च्या निकालात महाराष्ट्राने देशपातळीवर नावलौकिक मिळविला. स्थानिक पातळीवर धुळे शहराचा विचार करता या निकालात धुळे शहर देशपातळीवर ५७ व्या स्थानी, तर राज्य पातळीवर १२ व्या स्थानी आहे.

मागील काही वर्षांचा विचार करता ही स्थिती समाधानकारक की घसरण याबाबत विचार करण्याची गरज आहे. (Dhule city is 57th in country 12th in state dhule news)

मात्र, लोकसंख्येबाबत निकष बदलल्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्याची ही कामगिरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी कदाचित दिलासा देणारी असेल. २०२० च्या निकालाची तुलना केली तर मोठी घसरण दिसते. दरम्यान, कचरामुक्तीत धुळे शहराने थ्री-स्टार मानांकन प्राप्त केले आहे ,तर हागणदारीमुक्तीत ओडीएफ प्लस-प्लस दर्जा मिळविला आहे.

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत शहरांच्या स्वच्छतेवर मोठा भर आहे. या अभियानांतर्गत वर्षभर विविध उपक्रम, जनजागृती, अभियाने, मोहिमा राबविल्या जातात. स्वच्छतेसाठी व एकूणच घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडे मोठ्या प्रमाणावर निधीही दिला जातो. या निधीतून शहरांची स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाची स्थिती सुधारली जावी, अशी अपेक्षा आहे.

गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या अभियानातून धुळे शहरातही अनेक उपक्रम राबविले जात आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी कामेही सुरू आहेत. याची फलनिष्पत्ती काय याबाबत मात्र मतमतांतरे आहेत. गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक चर्चा, आरोप-प्रत्यारोपांचा विषय कोणता असेल तर तो स्वच्छता, कचरा संकलनाचाच राहिल्याचे पाहायला मिळाले.

dhule municipal corporation
Naukri Survey 2023 : नोकर कपातीतून कर्मचाऱ्यांना दिलासा! नोकरी डॉट कॉमच्या सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर

भाजपच्या कार्यकाळात कचरा संकलनाच्या कामासाठी एका ठेकेदार कंपनीला बाजूला सारून दुसऱ्या कंपनीला आणले गेले. मात्र, त्यानंतरही शेवटपर्यंत तक्रारी, आरोप सुरू राहिले. अगदी महापालिकेच्या शेवटच्या स्थायी सभा, महासभेपर्यंत हा विषय उपस्थित होत राहिल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे विरोधकांपेक्षा सत्ताधारीच याप्रश्‍नी असमाधानी पाहायला मिळाले.

धुळ्याची स्थिती

स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ च्या निकालात महाराष्ट्राने देशपातळीवर नावलौकिक कमावल्याचे पाहायला मिळाले. धुळे शहराची स्थिती मात्र कोण कसा अर्थ लावणार यावर आधारित दिसते. देशपातळीवर धुळे शहर ५७ व्या क्रमांकावर आले आहे, तर राज्य पातळीवर धुळ्याचे स्थान १२ व्या स्थानी आहे.

स्थिती सुधारली की बिघडली?

दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ मध्ये धुळे शहर पर्यायाने धुळे महापालिकेची कामगिरी कुठे, असा प्रश्‍न आहे. या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणातील कामगिरीबाबत निकष बदलल्याचे सांगितले जाते. पूर्वी एक लाख, तीन लाख, पाच लाख लोकसंख्येनुसार निकाल दिला जात होता.

dhule municipal corporation
Clean Survey Scheme : स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर सज्ज; सार्वजनिक भिंतींचे सुशोभीकरण

यंदा मात्र एक लाखाच्या आतील व एक लाखावरील लोकसंख्या असा निकाष लावून निकाल लागल्याची माहिती मिळाली. हा निकष असेल तर धुळ्याची स्थिती तुलनेने वाईट की चांगली यावर मतमतांतरे असू शकतील. याबाबत आता धुळेकर नागरिक व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच अर्थ लावण्याची व त्याबाबत निष्कर्ष काढण्याची गरज आहे.

मागील स्थिती अशी

स्वच्छ सर्वेक्षणात धुळे शहराने २०१८ मध्ये देशात ७८ वा, २०१९ मध्ये १०० वा, तर २०२२ मध्ये देशात ५० वा आणि राज्यात १० वा क्रमांक मिळविला होता. २०२० मध्ये तर कमालच झाली होती, त्या वेळी धुळे शहराने देशात नववा, तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. धुळ्याच्या या भरारीने धुळेकर नागरिकांसह काही पदाधिकारी, नगरसेवकही बुचकळ्यात पडले होते.

dhule municipal corporation
Clean Survey 2023 : वैयक्तिक शौचालयांसाठी अकराशे अर्ज प्राप्त; महापालिकेच्या आवाहनानंतर प्रतिसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.