भाजपमधील विविध पदांच्या वर्चस्ववादात धुळे शहराची फरफट होत असल्याचे लपून राहिलेले नाही. त्याची जाणीव स्थानिक नेतेमंडळी, प्रमुख पदाधिकाऱ्यांना व्हावी, अशी अपेक्षा आहे.
परंतु, पक्षीय वर्चस्ववादातून शहरात नेमके काय घडत आहे, त्याचे काय परिणाम घडू लागले किंवा घडू शकतात ते धुळेकरांना काही कळत नाही, असे काही नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांना वाटत असावे. मात्र, तो त्यांचा गोड गैरसमज ठरावा. (dhule city is suffering in bjp power news)
निधी किती सार्थकी लागला?
महापालिकेची गेली निवडणूक भाजपने पाणीप्रश्नावर लढली. त्याचे साडेचार वर्षांत काय झाले? टंचाईचा कालावधी निघून गेल्यावरही धुळेकर पाणीपुरवठ्याबाबत समाधानी आहेत का, अशी विचारणा झाली तर नकारात्मक उत्तर असेल.
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेभोवती सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असला तरी तापी योजनेवेळी ज्या भानगडी होत्या, त्याच अक्कलपाड्याबाबत होत असल्याचे म्हटले जाते. शहरात रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला जात असल्याचे चित्र रंगविण्यात नेतेमंडळी, पदाधिकारी यशस्वी दिसत असतील. मात्र, खाबूगिरी आणि गुणवत्तेअभावी हा निधी किती सार्थकी लागला ते देव जाणे, असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून आहे.
अपयश नेमके कुणाचे समजावे?
शहरातील १५६ कोटींची ब्रिटिशकालिन जलवाहिनी व जलकुंभ योजनेचा लाभ नाही, केंद्र पुरस्कृत भूमिगत गटार योजना अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. खड्ड्यांप्रश्नी जनआक्रोश होत असला तरी त्याच्याशी काही देणेघेणे नाही, अशा अविर्भावात भाजपसह महापालिका दिसते. टॉवर बगीचा, पांझरा चौपाटीवरील उद्यानाचा प्रश्न भिजत पडला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मनपास्तरावर नियोजन व दूरदृष्टीचा अभाव असल्याने जळीस्थळी अतिक्रमणे, पार्किंग व हॉकर्स झोनचा प्रश्न, ५७ कोटींचा ठेका देऊनही सर्वत्र अस्वच्छता, मोकाट जनावरे, रखडलेले अस्वच्छ पांझरा नदीचे सौंदर्यकीकरण आदी असंख्य समस्या ‘जैसे थे’ आहेत. याबाबत नेमके कुणाचे अपयश समजावे?
भाजपच्या त्रिमूर्तीवर उघड नाराजी
ज्या अपेक्षेने धुळेकरांनी भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता दिली, तिचे पक्ष आणि सामाजिक स्तरावर ऑडिट होण्याची गरज आहे. सत्तेच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत शहर विकासाकडे लक्ष देण्यापेक्षा त्याच्या आड संगनमताने महापालिकेत जी बेबंदशाही सुरू आहे, तिला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन लगाम घालू शकलेले नाहीत.
त्यामुळे त्यांच्यावरही नाराजीचा सूर आहे. शेजारचे शिरपूर, नंदुरबार गतीने विकसित होत असताना त्या कसोटीला आपण धुळे शहरात का उतरू शकत नाही, याचे एकदा आत्मपरिक्षण करण्याची वेळ भाजपवर आल्याचे बोलले जाते.
फक्त प्रतिमा मिरवून विकास शक्य?
सत्तेतील महासभा, स्थायीच्या सभा पाहिल्या तर त्यांचे इतिवृत्त बोलके ठरावे, असे आहे. त्याचा सत्ताधारी भाजपचे नाराज नगरसेवक, त्यांनी मनपातील भ्रष्टाचार, विविध समस्या आणि उदासीन प्रशासनावर वेळोवेळी केलेला तक्रारींचा हल्ला, त्यातून पक्षाला दिलेला घरचा आहेर हा पुरावाच ठरावा.
परंतु, वर्चस्वाच्या राजकारणात मी कसा मोठा... हेच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर दाखवून देण्यात नेते, पदाधिकारी गुंतून राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अन्य काही मंत्र्यांची प्रतिमा शहरात मिरवून भाजप व आम्ही कसे चांगले हे दर्शविण्यातच धन्यता मानली जाताना दिसते. मात्र, त्यावरच शहराचा विकास अवलंबून आहे का? हे नेते, पदाधिकाऱ्यांनी आता उपेक्षित धुळेकरांना पटवून देण्याची वेळ आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.