Dhule Code Of Conduct : परवानाधारकांची 482 शस्त्रे जिल्ह्यातून जमा; लोकसभा निवडणुकीमुळे कार्यवाही

Dhule News : आचारसंहितेच्या काळात अवैध शस्त्रेच काय तर परवाना घेतलेली शस्त्रेदेखील स्वत:जवळ बाळगू शकत नाहीत.
weapons of license holders collected from dhule district
weapons of license holders collected from dhule districtesakal
Updated on

Dhule News : आचारसंहितेच्या काळात अवैध शस्त्रेच काय तर परवाना घेतलेली शस्त्रेदेखील स्वत:जवळ बाळगू शकत नाहीत. ती शस्त्रे नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करावी लागतात. जिल्ह्यात ४९८ जणांकडे शस्त्र परवाने आहेत. त्यांपैकी ४८२ जणांनी आतापर्यंत शस्त्रे जमा केली आहेत. जिल्ह्यात चार तालुके आणि ९७ पोलिस ठाणी आहेत. या पोलिस ठाण्यांतर्गत ४९८ जणांनी शस्त्र बाळगण्याचा परवाना घेतला आहे. (Dhule Code Of Conduct 482 weapons of license holders collected from district)

यातील बहुतांश जणांनी आत्मसंरक्षणासाठी परवाना घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात या शस्त्रांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून शस्त्रे जमा करावी लागतात. तसे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांतर्गत ४८२ परवानाधारकांनी आतापर्यंत आपली शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा केली आहेत. (latest marathi news)

weapons of license holders collected from dhule district
Dhule Summer Heat : वाढत्या उष्णतेमुळे फूलगळतीचे संकट

गरज नसतानाही व परवाना नसतानाही काही जण अवैधरीत्या शस्त्र बाळगत असतात. मात्र, असे केल्यास आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. समाजमाध्यमांवर लाइक्स मिळविण्याच्या प्रयत्नात काही जण तलवारीने केक कापतात.

हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ व्हायरल करतात. आचारसंहिता लागताच परवानाप्राप्त शस्त्रेही नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करावी लागतात. शस्त्रे जमा न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येते.

weapons of license holders collected from dhule district
Dhule News : विविध हंगामी व्यावसायिकांचे नुकसान; पांझरा नदीतील पाण्याचा फटका; यात्रोत्सवापूर्वी आर्थिक संकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.