Tree Planting : विभागांनी मियावाकी पद्धतीवर भर द्यावा : जिल्हाधिकारी गोयल

Dhule News : महाविद्यालये, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, पालिकेच्या मोकळ्या जागेत ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षारोपण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
Abhinav Goyal giving information about the Miyawaki method to fellow officers at the Collector's office under the Tree Plantation campaign.
Abhinav Goyal giving information about the Miyawaki method to fellow officers at the Collector's office under the Tree Plantation campaign.esakal
Updated on

Dhule News : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात ५० लाख वृक्षलागवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्षलागवड व्हावी, याकरिता सर्व ग्रामपंचायती, खासगी शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, पालिकेच्या मोकळ्या जागेत ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षारोपण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. (Tree Planting)

‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षलागवड कार्यक्रम-२०२४ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी (ता. १२) सकाळी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्याबाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी गोयल बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग.

महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीनकुमार मुंडावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गिते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की वृक्षलागवडीसाठी गाव तेथे मियावाकी, ग्रामपंचायत, गायरान जमीन, पडीक जमीन, सरकारी शाळा, स्मशानभूमी, खासगी शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, पालिकेच्या मोकळ्या जागेत मियावाकी पद्धतीने रोपवाटिका तयार करावी. (latest marathi news)

Abhinav Goyal giving information about the Miyawaki method to fellow officers at the Collector's office under the Tree Plantation campaign.
Dhule News : रखडलेल्या गटार कामाने घेतला एका मजुराचा बळी; धुळ्यात सुरक्षिततेचे नियम अधिकाऱ्यांकडूनच धाब्यावर

या मियावाकी पद्धतीने वृक्षाची लागवड केल्यास कमी जागेत जास्त झाडांची लागवड होते. या पद्धतीचा वापर करून १० मीटर बाय १० मीटर जागेमध्ये जवळपास विविध प्रजातीच्या ३०० झाडांची लागवड करू शकतो. यात मोठ्या, मध्यम व सबट्री प्रकारची वृक्ष लागवड करता येते. या पद्धतीने वृक्षाची लागवड केल्यास झाडांची कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ होते.

त्याचप्रमाणे वृक्षलागवडीसाठी बिहार पॅटर्न, अकोला पॅटर्न, कन्या वनसमृद्धी योजनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करून मोठ्या प्रमाणात प्रत्येक नागरिकाला तसेच विविध विभागांनी वृक्षलागवड करून या मोहिमेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गिते यांनी मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड कशी करावी याबाबत उपस्थितांना प्रात्यक्षिक दाखविले.

Abhinav Goyal giving information about the Miyawaki method to fellow officers at the Collector's office under the Tree Plantation campaign.
Dhule News : आचारसंहितेनंतर पहिल्याच स्थायीत कोट्यवधींची कामे मंजूर, 75 लाखांवर कार्योत्तर खर्चही मान्य

मियावाकी पद्धत अशी

जपानी शास्त्रज्ञ मियावाकी यांनी ही पद्धती विकसित केली आहे. यात सर्वसाधारणपणे एक हजार चौरसफूट जागेत २५० मोठ्या, मध्यम व लहान वृक्षांची लागवड करतो येते. यात उंच वाढणारे, मध्यम, मध्यम वाढणारे वृक्षांचा समावेश असतो. या पद्धतीने वृक्षलागवड केल्यास वृक्षांमध्ये सूर्यप्रकाश, वारा व अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होऊन त्यांची दहापट वाढ जोमात होते.

तसेच दोन वर्षांनंतर झाडांची निगा घ्यावी लागत नाही. यामुळे साधारणतः तीन वर्षांत घनदाट जंगल तयार होऊन जंगलात विविध पक्षी आपले आश्रयस्थान निर्माण करतात. यातून निसर्गाचा समतोल राहण्यास मदत होते.

Abhinav Goyal giving information about the Miyawaki method to fellow officers at the Collector's office under the Tree Plantation campaign.
Dhule News : रस्ते, पुलांसाठी 62, पाझर तलाव दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.