Dhule District Collector : भूमिअभिलेख विभाग बळकटीसाठी निधी देऊ : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Dhule News : जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातर्फे १३ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करण्यात आला.
District Collector Abhinav Goyal while discussing with officials on the occasion of National Geodetic Day.
District Collector Abhinav Goyal while discussing with officials on the occasion of National Geodetic Day.esakal
Updated on

Dhule News : जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातर्फे १३ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी धुळे जिल्ह्यात भूमिअभिलेख विभाग अधिक बळकट करण्यासाठी नियोजन विभागामार्फत आवश्यक निधी दिला जाईल, असे सांगितले. (Dhule Collector Abhinav Goyal statement Funds will be given to strengthen land records department)

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख अधिकारी दत्तात्रय वाघ आदी उपस्थित होते. भूमी अभिलेख विभागाने Employee of The Month यांसारखे उपक्रम राबवून भूमिअभिलेख विभागातील प्रलंबितता कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना श्री. गोयल यांनी दिल्या.

या वेळी त्यांच्या हस्ते वर्ष-२०२३-२४ मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २० कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीतून मंजूर निधीतून १५ रोव्हर मशिनचे वाटप करण्यात आले. (latest marathi news)

District Collector Abhinav Goyal while discussing with officials on the occasion of National Geodetic Day.
Dhule News : जिल्हा प्रशासनाला 76 कोटींचा महसूल; धुळ्यात 106 टक्के वसुलीद्वारे उद्दिष्ट पूर्ण

जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख अधिकारी वाघ यांनी धुळे जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागाच्या विविध कामकाजाच्या प्रगतीबाबत तसेच भूमिअभिलेख विभागाच्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. तर भूमिअभिलेख विभागाचा इतिहास, वर्तमान व भविष्यातील भूमिअभिलेख विभाग कसा असेल याबाबत उपअधीक्षक भूमिअभिलेख किरणकुमार पाटील यांनी माहिती दिली.

या वेळी नकाशाचा इतिहास या नव्या इंटरनेट ब्लॉगचे जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन करण्यात आले. भूकरमापक ललेश पाटील यांनी जिल्हाधिकारी गोयल यांना रोव्हर मशिनचे लाइव्ह प्रात्यक्षिक दाखविले. या वेळी उपअधीक्षक भूमिअभिलेख गोविंद भाबड, भास्कर वाघमोडे तसेच धुळे जिल्हा भूमिअभिलेख विभागाचे कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

District Collector Abhinav Goyal while discussing with officials on the occasion of National Geodetic Day.
Dhule Lok Sabha Constituency : 'लोकसंग्राम', जनता दलामुळे काँग्रेस पक्षाचे स्वप्न धुळीस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.