Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी समन्वय ठेवा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Dhule Lok Sabha Election : जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय राखून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.
Collector Abhinav Goyal speaking in a review meeting in connection with the upcoming Lok Sabha elections.
Collector Abhinav Goyal speaking in a review meeting in connection with the upcoming Lok Sabha elections.esakal
Updated on

Dhule Lok Sabha Election : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची प्रक्रिया शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय राखून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची गुरुवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठक झाली. (Dhule Collector Abhinav Goyal statement Maintain coordination for Lok Sabha election process)

जिल्हाधिकारी गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी राहुल जाधव, सीमा अहिरे, नितीनकुमार मुंडावरे, शरद मंडलिक, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, उपायुक्त संगीता नांदूरकर, पालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्यासह नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की आगामी लोकसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी नियुक्त प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची सखोल माहिती घ्यावी. त्याप्रमाणे नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी.

वेळोवेळी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घ्यावा. मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करून निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे. वृद्ध व दिव्यांग मतदार बांधवांना मतदान केंद्रावर आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक त्या सोयी-सुविधांची व्यवस्था करावी. (latest marathi news)

Collector Abhinav Goyal speaking in a review meeting in connection with the upcoming Lok Sabha elections.
Dhule News : ‘सीईओं’विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर; जिल्हा परिषद सभेत सर्वपक्षीय सदस्यांची एकजूट

बॅनर, पोस्टर काढा

टपाल विभागाने निवडणूक आयोगामार्फत वितरित केलेले ई-पीक मतदानकार्ड त्वरित वितरित करून वितरणाचा अहवाल सादर करावा. आचारसंहिता घोषित झाल्याबरोबर आदर्श आचारसंहितेची त्वरित अंमलबजावणी करावी. माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, कंट्रोल रूम, आचारसंहिता कक्ष, कंट्रोलरूम त्वरित स्थापन करावे.

शासकीय आवारातील पोस्टर, बॅनर, कोनशिला तसेच संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र त्वरित काढून टाकावेत. अतिदुर्गम भागात संपर्क होत नसलेल्या ठिकाणी संपर्कासाठी आवश्यक नियोजन करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जागृती करावी.

विविध कामांचा आढावा

बैठकीत मनुष्यबळ व्यवस्थापन, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा, मतदान केंद्रातील व्यवस्थापन, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, साधनसामग्री व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था.

निवडणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्था, निवडणूक प्रशिक्षण, मीडिया प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, हेल्पलाइन व तक्रारींचे निरसन साहित्य व्यवस्थापन, ईव्हीएम मॅनेजमेंट या विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला.

Collector Abhinav Goyal speaking in a review meeting in connection with the upcoming Lok Sabha elections.
Dhule News : सोने-चांदी महागल्याने बजेट विस्कळित; लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांवर संकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.