Dhule News : धुळ्यात सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Dhule News : लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यात एक हजार ७०४ मतदान केंद्रे असतील. पैकी ४८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी वेब कॉस्टिंगची व्यवस्था असेल.
Collector Abhinav Goyal
Collector Abhinav Goyalesakal
Updated on

Dhule News : लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यात एक हजार ७०४ मतदान केंद्रे असतील. पैकी ४८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी वेब कॉस्टिंगची व्यवस्था असेल. लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सर्वांत कमी २८८ मतदान केंद्रे असलेल्या धुळे शहर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ३५ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. (Collector Abhinav Goyal statement Most sensitive polling stations in Dhule)

शिरपूर तालुक्यात दोन, शिंदखेडा तालुक्यात आठ, धुळे ग्रामीणमध्ये पाच, तर साक्री तालुक्यात चार संवेदनशील केंद्रांचा अंतर्भाव आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. निवडणुकीच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनासह निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील आहे. पोलिसांनी निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यथोचित प्रयत्न, उपाययोजना, कार्यवाही सुरू केलेली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत सराईत गुन्हेगारांना हद्दपार करणे, काहींवर स्थानबद्धतेची कारवाई करणे आदी उपाययोजना राबविल्या जात आहेत. प्रशासनाकडून संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

अतिसंवेदनशील केंद्रे

धुळे शहरातील अतिसंवेदनशील केंद्रे अशी ः महाजन हायस्कूल उत्तर बाजूची इमारत (खोली क्रमांक १, ६, २, ४, ८, १०), मनपा शाळा क्रमांक २० उत्तर बाजूची इमारत (पूर्व बाजू खोली क्रमांक १, २, ३), नवीन इमारत (दक्षिण बाजू खोली क्रमांक १ ते ३), मनपा मुलींची ऊर्दू शाळा क्रमांक २५, मौलवीगंज (खोली क्रमांक १ व ५).

मनपा शाळा क्रमांक ४३ उत्तर बाजूची (खोली क्रमांक १), मनपा शाळा क्रमांक ५५-५६ मोहाडी पूर्व बाजूची इमारत (दक्षिण बाजू खोली क्रमांक १ ते ३), (उत्तर बाजूची खोली क्रमांक १ ते ३), मनपा शाळा क्रमांक २८, राऊळवाडी (खोली क्रमांक १ ते ४, ७ ते १०), समता विद्यालय, रासकरनगर, जुनी इमारत (खोली क्रमांक १ ते ५). (latest marathi news)

Collector Abhinav Goyal
Dhule Lok Sabha Election : डॉक्टरांचाही आता राजकीय दबावगट!

विविध ग्रामीण क्षेत्र

धुळे ग्रामीण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा (खोली क्रमांक १ व २), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोघन (खोली क्रमांक १ ते ३), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वणी (ता. शिंदखेडा) पूर्वेकडील खोली क्रमांक १, दोंडाईचा वरवाडे नगर परिषद शाळा क्रमांक ९ (पूर्व-पश्चिम-पूर्वेकडून इमारत खोली क्रमांक २),

पूर्व-पश्चिम इमारत क्रमांक २ (पश्चिमेकडून खोली क्रमांक २), (पश्चिमेकडील खोली क्रमांक १), पूर्व-पश्चिम इमारत क्रमांक २ (पश्चिमेकडील खोली क्रमांक १), शिंदखेडा जिल्हा परिषद प्राथमिक मध्यवर्ती शाळा (उत्तरेकडून खोली क्रमांक १), जिल्हा परिषद प्राथमिक मध्यवर्ती शाळा, चिमठाणे (दक्षिणेकडून खोली क्रमांक १), शिंदखेडा जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा (पूर्वेकडून खोली क्रमांक १),

के. ए. एम. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर (ता. साक्री) उत्तर-दक्षिण जुनी इमारत (उत्तरेकडून खोली क्रमांक २), पूर्व बाजू, उत्तर-दक्षिण पूर्व जुनी इमारत (उत्तर बाजूची खोली क्रमांक ४), पूर्वेकडील उत्तर-दक्षिण जुनी इमारत (उत्तर बाजूची खोली क्रमांक ६), पूर्व बाजू, उत्तर-दक्षिण जुनी इमारत (पश्चिमेकडून खोली क्रमांक १).

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनी, सांगवी (ता. शिरपूर) उत्तर बाजूची खोली क्रमांक एक व दोन. ही सर्व मतदान केंद्रे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोयल यांनी अतिसंवेदनशील म्हणून घोषित केली आहेत.

Collector Abhinav Goyal
Dhule Lok Sabha Constituency : मविआ- महायुतीत अजूनही मालेगावात रुसवेफुगवे सुरूच

संवेदनशील केंद्र कसे ठरते?

ज्या मतदान केंद्रातील बोगस मतदानाचे अधिक प्रमाण, दादागिरी, भांडणे, शिवीगाळ आदी प्रकारांवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे किंवा केंद्रावर एकाच उमेदवाराला सरासरी ७५ टक्के मतदान झाले आहे. झालेल्या मतदानापैकी ९० टक्के मतदान एकाच उमेदवाराला झाले असल्यास प्रशासनाकडून असे मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात येते.

संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्या केंद्रांवर स्वतंत्र निरीक्षक नेमले जाणार आहेत. अशा मतदान केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे लाइव्ह वेबकास्ट ऑनलाइन प्रक्षेपण केले जाणार आहे.

संवेदनशील मतदान केंद्र

(विधानसभा मतदारनिहाय)

* मतदारसंघ : केंद्र........ संवेदनशील

* धुळे ग्रामीण : ३७५........ ०५

* धुळे शहर : २८८........ ३५

* शिंदखेडा : ३३८........०८

* मालेगाव मध्य : ३४३........००

* मालेगाव बाह्य : ३३७........००

* बागलाण : २८८........००

* एकूण : १,९६९........४८

"केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदर्श मार्गदर्शक तत्त्वानुसार लोकसभेच्या धुळे मतदारसंघात ४८, तर धुळे जिल्ह्यात ५४ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार तेथे प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. विशेष अधिकाऱ्याच्या नियुक्तीसह पोलिस बंदोबस्त वाढविला जाईल. त्यानुसार नियोजनावर कटाक्ष आहे." -अभिनव गोयल, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, धुळे

Collector Abhinav Goyal
Dhule Lok Sabha Constituency : निवडणुका आल्या अन गेल्या, प्रकल्पांची केवळ चर्चाच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.