Dhule Tree Plantation : जागतिक तापमानवाढ, हवामानातील बदल, उष्णतेची दाहकता व तीव्रता कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यात या वर्षी ५० लाख वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी सर्व विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यानुसार सर्व विभागांनी वृक्षलागवडीचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या. ( Achieve 50 lakh tree plantation target )
पन्नास लाख वृक्षलागवड कार्यकमांतर्गत नवीन नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीनकुमार मुंडावरे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, सर्व तहसीलदार, पालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की धुळे जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्र वनाखाली आहे. वृक्ष हे वातावरणात पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. याचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्यात या वर्षी पावसाळ्यात ५० लाख वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेऊन प्रत्येक विभागास देण्यात आलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. (latest marathi news)
महापालिका क्षेत्र, नगरपंचायत क्षेत्र, ग्रामपंचायत क्षेत्रातील मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, शाळा, महाविद्यालय, टेकड्यांच्या ठिकाणी तसेच वन विभागांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात यावी. ग्रामपंचायत, महापालिका, नगरपंचायत क्षेत्रात वृक्षलागवडीचे संरक्षण व संगोपन करण्याची जबाबदारी ही ‘बिहार पॅटर्न’नुसार २०० रोपांच्या एक घटकाचे संगोपन करण्याची जबाबदारी चार कुटुंबास द्यावी, रोपांची संख्या कमी-जास्त असल्यास त्याचे समान वाटप सर्व घटकांमध्ये करण्यात यावे.
२,५०० हेक्टरवर बांबूलागवड
शालेय शिक्षण विभागाने एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम ‘अकोला पॅटर्न’ म्हणून जिल्ह्यात राबवावा. येत्या वर्षात जिल्ह्यात दोन हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बांबूलागवडीचे उद्दिष्ट असून, त्याअनुषंगाने संबंधित विभागाने बांबूलागवडीचे नियेाजन करावे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षलागवड करावी. आदिवासी विकास विभागाने सर्व आश्रमशाळा परिसरात, तर विद्युत विभागाने सबस्टेशन, गायरान जमिनीवर वृक्षलागवड करावी.
वृक्षलागवडीचे ठिकाण निश्चित करून त्याचा अहवाल या आठवड्यात सर्व विभागांनी द्यावा. तसेच वृक्षारोपणासाठी विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्क्षूम नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. उपजिल्हाधिकारी (रोहयो) मुंडावरे यांनी सर्व विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट, उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेले नियोजन, रोपांची उपलब्धता आदी माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.