Dhule News : संपादित जमिनीचा मोबदला लवकरच : आमदार पाटील; अक्कलपाडा प्रकल्प वितरिकांसाठीचे भूसंपादन

Dhule News : या संपादित जमिनीचा एकूण आठ कोटी पाच लाखांवर मोबदला संबंधित शेतकऱ्यांना लवकरच मिळेल, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली.
MLA Kunal Patil
MLA Kunal Patilesakal
Updated on

Dhule News : अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या मुख्य वितरिका, मुख्य वितरिकांची मायनर व इतर वितरिकांसाठी अकलाड, सांजोरी, सुट्रेपाडा, नवलाणे, नूरनगर, कुसुंबा, वार आणि कावठी या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित केल्या आहेत. या संपादित जमिनीचा एकूण आठ कोटी पाच लाखांवर मोबदला संबंधित शेतकऱ्यांना लवकरच मिळेल, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. (Dhule Compensation for acquired land soon MLA Patil)

जलसंपदा विभागाने फेब्रुवारी-२०२४ मध्ये भूसंपादन अधिकारी, धुळे यांच्या कार्यालयात अकलाड, नवलाणे, सांजोरी, सुट्रेपाडा, नूरनगर येथील २३ शेतकऱ्यांचे एक कोटी ४६ लाख रुपये जमा केले असून उर्वरित निधीसाठी अप्पर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग यांची भेट घेऊन निधीची मागणी केल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

संबंधित गावातील संपादित शेतजमिनीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकरी सतत संपर्क साधत असून एकूण आठ कोटी पाच लाख ८९ हजार ३२० रुपयांपैकी सहा कोटी ५९ लाख ८८ हजार ९५२ रुपये निधी धुळे मध्यम प्रकल्प विभागाला मिळणे बाकी आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे राज्य शासनाकडून अद्याप हा निधी आलेला नसल्याने तो निधी लवकरात लवकर मिळावा, यासाठी आमदार पाटील यांनी जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिवांकडे मागणी केली आहे. (latest marathi news)

MLA Kunal Patil
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या वक्तव्यावर जरांगेंचा थेट आरोप

जलसंपदा विभाग धुळेने भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा केलेला एक कोटी ४६ लाख ३६८ रुपयांचा निधी आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच वितरित करण्यात येणार असून उर्वरित निधीसाठी मंत्रालय आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

MLA Kunal Patil
Konkan Tourism : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पर्यटकांची संख्या रोडावली; काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.