Dhule News : PM, CMपर्यंत तक्रार; पण महापालिका यंत्रणा हलता-हलेना! घरासमोरील तुंबलेल्या गटारप्रश्‍नी प्रा. डॉ. अन्सारींचा संताप

Dhule News : समस्या सुटत नसल्याने वैतागलेले तक्रारदार प्राध्यापक आता याप्रश्‍नी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. याबाबत निगरगठ्ठ मनपा प्रशासनाविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Prof. Tasha Galli in Dhule city. Dr. Clogged drain in front of Salim Ansari's house.
Prof. Tasha Galli in Dhule city. Dr. Clogged drain in front of Salim Ansari's house.esakal
Updated on

Dhule News : महापालिकेच्या यंत्रणेकडून गटाराची साफसफाई होत नसल्याने कधीकाळी सहा फूट खोल गटार आता केवळ सहा इंच खोल राहिली आहे. या घरालगतच्या तुंबलेल्या गटारामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने एका प्राध्यापकाने मनपा आयुक्त, मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी, राज्य मानवाधिकार आयोग, स्वच्छता अभियान विभाग ते थेट पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. मात्र, तरीही समस्या सुटत नसल्याने वैतागलेले तक्रारदार प्राध्यापक आता याप्रश्‍नी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. याबाबत निगरगठ्ठ मनपा प्रशासनाविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Dhule Complaint to PM CM But municipal system neglect)

शहरातील ताशागल्ली येथे प्रा. डॉ. महम्मद सलीम अन्सारी यांचे घर आहे. त्यांच्या घरालगतच तीन फूट रुंद व सहा फूट खोल नालास्वरुप दगडी गटार आहे. ती त्यांच्या घरापासून पुढे साधारण ५० फूट अंतरावर मध्यवर्ती नाल्यास मिळते. मात्र, वर्षानुवर्षे या गटाराची व्यवस्थित साफसफाई न झाल्याने सहा फूट खोलीची गटार सद्यःस्थितीत सहा इंच खोलीची राहिल्याचे प्रा. अन्सारी यांचे म्हणणे आहे.

धुळे महापालिकेकडून व्यवस्थित साफसफाई नसल्याने गाळ साचून या गटाराचा प्रवाह मंदावल्याचा आरोप प्रा. अन्सारी यांनी केला आहे. उथळ झालेल्या या गटाराचे पाणी अनेकदा रस्त्यावर येते, घाण उचलण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. परिणामी दुर्गंधी पसरते.

सकाळी रस्ता साफसफाई करणारे कर्मचारी सर्व कचरा पुन्हा तेथेच लावतात. त्यामुळे तेथे कचराकुंडी तयार होते. ही सर्व समस्या आपल्यासह कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. गटार व्यवस्थित वाहत नसल्याने घाण पाणी तेथेच साचलेले राहते. (latest marathi news)

Prof. Tasha Galli in Dhule city. Dr. Clogged drain in front of Salim Ansari's house.
कात्रज कोंढवा मार्गावर पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो पलटी; 20 वारकरी जखमी

त्यामुळे गटारातील घाण पाणी आपल्या घरात झिरपते, त्यामुळे घराच्या भिंती व पाया कमकुवत होत आहे. अर्थात या गटाराच्या समस्येमुळे आपल्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न कायम असतो. या समस्येमुळेच अनेकदा रुग्णालयात दाखल व्हावे, लागल्याचे प्रा. डॉ. अन्सारी यांनी म्हटले आहे.

अन्यथा उपोषण

या गटारातील स्थिरावलेले सांडपाणी वाहते होईल, ते घरात झिरपणार नाही यादृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी. तक्रारी करून आता बेजार झालो आहे. मनपा आरोग्याधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवूनही ते केवळ आश्‍वासन देतात. प्रत्यक्षात आजपर्यंत काहीही काम केलेले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही समस्या न सुटल्यास उपोषणाला बसू व त्यामुळे होणाऱ्या परिणामास सर्वस्वी मनपा आयुक्त जबाबदार असतील, असा इशारा प्रा. डॉ. अन्सारी यांनी दिला आहे.

Prof. Tasha Galli in Dhule city. Dr. Clogged drain in front of Salim Ansari's house.
Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.