Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेसाठी कॉंग्रेसतर्फे 2 नवीन नावांची चर्चा

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊन दोन आठवडे उलटले.
Dr. Tushar Shewale and Shyam Saner
Dr. Tushar Shewale and Shyam Saneresakal
Updated on

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊन दोन आठवडे उलटले. महायुतीतर्फे विद्यमान खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीचे विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे सुरु झाले आहेत. बागलाण येथील मेळाव्यात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी डॉ. भामरे यांच्याविषयी रोष व्यक्त केला. कांदा प्रश्‍नामुळे मतदारसंघात काहीशी नाराजी आहे. (Dhule Lok Sabha Election)

मात्र ही नाराजी कॅश करण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुसंख्य जागेवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे. मात्र धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. कॉंग्रेसतर्फे नाशिक जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे कॉंग्रेसचे अध्यक्ष श्‍याम सनेर या दोनच प्रमुख नावांची चर्चा आहे.

अशातच कॉंग्रेसच्या माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव व भाजपतर्फे इच्छूक असलेले डॉ. विलास बच्छाव यांचे नाव गेल्या काही दिवसापासून कॉंग्रेसतर्फे चर्चेत आले आहे. उमेदवारीची खात्री मिळाल्यास डॉ. बच्छाव कॉंग्रेस प्रवेश करु शकतात. महाविकास आघाडी डॉ. शेवाळे, सनेर यांच्या बरोबरच अन्य काही प्रबळ उमेदवारांचा शोध घेत आहे.

यातच पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे पोलिस निरीक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. श्री. ठाकरे हे देखील महाविकास आघाडीकडून इच्छूक असून कॉंग्रेसची उमेदवारी मिळाल्यास ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. श्री. ठाकरे मुळचे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांची पोलिस कारकिर्द गाजलेली आहे. ऐनवेळी कॉंग्रेस त्यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब करु शकते. (Dhule Political News)

Dr. Tushar Shewale and Shyam Saner
Loksabha 2024: शिंदेंना मिळणार लोकसभेच्या १४ जागा पण उमेदवार निवडीत एकच अट?

गेल्या दोन महिन्यापासून मतदारसंघात महाविकास आघाडी व कॉंग्रेसतर्फे चाचपणी करणारे व स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आयपीएस अधिकारी अब्दुल रहेमान यांना कॉंग्रेसकडून उमेदवारीची खात्री न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा वंचित बहुजन आघाडीकडे वळविला आहे. वंचित बहुजन आघाडीने अब्दुल रहेमान यांची उमेदवारी जाहीर केल्यात जमा आहे. डॉ. भामरे यांचे विरोधक अद्यापही आशा बाळगून आहेत.

राज्यातील शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २० मेस येथील मतदान होणार असल्याने भाजप उमेदवार बदलवू शकतो अशी आशा त्यांचे विरोधक बाळगून आहेत. याउलट आपल्याला कामकाज व मेरीटच्या जोरावर उमेदवारी मिळाल्याचे सांगत डॉ. भामरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. एकूणच आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाचीच उत्सुकता आहे. अशातच वंचित व एमआयएमची युती होणार नसल्याने या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार असेल की नाही याची देखील उत्सुकता आहे.

येथील एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मौलाना मुफ्ती हे रमजान पर्व काळात उमरा (मक्का मदीना) या धार्मिक यात्रेसाठी गेले आहेत. उमरा करुन शहरात ते परतल्यानंतरच एमआयएमची भूमिका स्पष्ट होईल. या लोकसभा मतदारसंघात धुळे शहर व मालेगाव मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे आमदार असून मुस्लीम मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर एमआयएमची भूमिका देखील महत्वपूर्ण ठरणार आहे.

Dr. Tushar Shewale and Shyam Saner
Loksabha Election 2024 : शिवसेनेला १४ जागा देण्याची भाजपची तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()