Farmers here making wooden pegs for drip irrigation.
Farmers here making wooden pegs for drip irrigation.esakal

Dhule Agriculture News : शिंदखेड्यात कापसाचे क्षेत्र घटणार; मकाचे क्षेत्र वाढणार

Dhule Agriculture : शिंदखेडा तालुक्यात गेल्यावर्षी भयानक दुष्काळाचे चटके सहन करीत असताना यंदा खरीप हंगामासाठी शेतकरीराजा सज्ज झाला आहे.
Published on

विजयसिंह गिरासे : सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : शिंदखेडा तालुक्यात गेल्यावर्षी भयानक दुष्काळाचे चटके सहन करीत असताना यंदा खरीप हंगामासाठी शेतकरीराजा सज्ज झाला आहे. गेल्यावर्षी कापसाचे उत्पन्न कमी आल्याने व कापसाच्या दर कमी असल्याने यंदा कापूस लागवडीखाली क्षेत्र दोन हजार हेक्टरने कमी होणार आहे. शेतकरी यंदा मका लागवडीकडे वळणार असून, सुमारे दोन हजार हेक्टरने मका लागवड वाढणार आहे. (Cotton area will decrease in Shindkheda but Maize area will increase)

आजपर्यंत बागायती कापूस पिकांची १४ हजार ३६८ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाला होता. राज्यात ४० तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्या तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश करण्यात आला होता. तालुक्यातील दहा महसूल मंडळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.

नवीन खरीप हंगाम सुरू होवून गेल्या वर्षीची काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत आजपर्यंत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता जरी मदत मिळाली तर बियाणे व खतांची शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तालुक्यात खरीप हंगामासाठी बीटी कापूस बियाण्याचे तीन लाख ४१ हजार ३५० पाकिटे उपलब्ध झाल्याची माहिती शिंदखेडा पंचायत समितीचे कृषी अधिकारी अभय कोर यांनी दिली.

गेल्या खरीप हंगामात तीन लाख ५९ हजार ७५५ पाकिटांची लागवड तालुक्यात करण्यात आली होती. तालुक्यात ७ जूनला मृगनक्षत्रात काही महसूल मंडळात तुरळक स्वरूपात पाऊस झाला. आता शेतकरी दमदार पावसांची प्रतिक्षेत आहेत.

''गेल्या खरीप हंगामात कापसाचे २७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली होती. गेल्या हंगामात कमी पर्जन्यमान झाल्याने कापसाचे उत्पन्न कमी आले. गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने व कापसाला बाजारभाव कमी असल्याने यंदा मकाची २५ एकरवर लागवड करणार असून, कापसाची फक्त पाच एकर लागवड करणार आहे.''- सर्जेराव पाटील, शेतकरी, सुकवद (ता. शिंदखेडा) (latest marathi news)

Farmers here making wooden pegs for drip irrigation.
Dhule Agriculture News : कोथिंबीर 150 रुपये प्रतिकिलो...! पितृपक्षामुळे किरकोळ विक्रीचे भाव कडाडले

शिंदखेडा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे दोन हजार हेक्टरने लागवडीचे क्षेत्र कमी होणार असून, मकाचे क्षेत्र दोन हजारपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड होणार आहे. आतापर्यंत बागायती कापसाची २० टक्के लागवड करण्यात आली आहे.''- शितलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, शिंदखेडा

२०२४-२५ पिक पेरणी लक्ष्यांक

तृणधान्य (हेक्टरमध्ये)

पिके सर्वसाधारण क्षेत्र अपेक्षित क्षेत्र

ज्वारी २३०० १४५५

बाजरी ११००० ९५००

मका ९१०० ९४४५

इतर तृणधान्य १५० ११०

कडधान्य

तूर ७०० ७५०

मूग ४८०० ४५००

उडीद ७०० ५५४

इतर कडधान्य २५० १००

गळीतधान्य

भुईमूग १८०० १३०२

सोयाबीन १०० ३५

तीळ ३५० ६०

इतर गळीतधान्य १०० ७४

कापूस

बागायत/जिरायत ६७००० ७१५००

बागायत कापूस लागवड साध्य (मंडळनिहाय)

शिंदखेडा ३२९२ हेक्टर

चिमठाणे २५५१ हेक्टर

नरडाणा ४२१० हेक्टर

दोंडाईचा ४३१५ हेक्टर

एकूण १४३६८ हेक्टर

Farmers here making wooden pegs for drip irrigation.
Dhule Agriculture News : लाखावर टन खतांचे आवंटन कृषी विभागाच्या मागणीतून मंजूर

खरीप २०२३ मध्ये मंडळनिहाय पाऊस

शिंदखेडा : ४२० मिलीमीटर

नरडाणा : ६०१ मिलीमीटर

खलाणे : ३८० मिलीमीटर

चिमठाणे : ४९१मिलीमीटर

वर्शी : ६१६ मिलीमीटर

बेटावद : ३५० मिलीमीटर

विरदेल : २८१मिलीमीटर

शेवाडे : २४१ मिलीमीटर

विखरण : १९८ मिलीमीटर

दोंडाईचा : १९८ मिलीमीटर

खरीप लागवड व पेरणी क्षेत्र

पिके २०२४ - २५

साध्य क्षेत्र प्रस्तावित क्षेञ

ज्वारी १५०० १८००

बाजरी ९५०० ५७००

मका ९४०० १०६००

तुर ७०० ६००

मुग ४५०० २२००

उडीद ५०० ५००

भुईमूग १३०० १०००

तिळ १०० १००

सोयाबीन १०० २००

सुधारीत कापूस १६७१० १९८००

बिटी कापूस ३८९९० ४८४७०

एकूण ५५७०० ६८२७०

ऊस ३०० ५००

खरीप हंगाम २०२४ रासायनिक खतांचे नियोजन (मे. टन)

खते मंजूर नियोजन उपलब्ध साठा

युरीया १०४२८ ४८५६

डीएपी ११४४ ३३०

एमओपी ७४८ २८७

Farmers here making wooden pegs for drip irrigation.
Dhule Agriculture News : भुईमूग शेंगा काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग; अपेक्षित भावाअभावी शेतकऱ्यांमध्ये नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.