Dhule Crime News : चोरट्यांची टोळी शिताफीने गजाआड! एलसीबीकडून 9 लाखांच्या 18 दुचाकी जप्त

Dhule News : साक्री तालुक्यासह विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने शिताफीने गजाआड केले.
Shrikant Dhiware, Shriram Pawar, Shrikrishna Pardhi and action team present during the inspection of the bikes seized by LCB.
Shrikant Dhiware, Shriram Pawar, Shrikrishna Pardhi and action team present during the inspection of the bikes seized by LCB.esakal
Updated on

Dhule News : साक्री तालुक्यासह विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने शिताफीने गजाआड केले. टोळीतील तिघांकडून त्यांनी लपवून ठेवलेल्या नऊ लाखांच्या तब्बल १८ दुचाकी हस्तगत केल्या. तसेच सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. (Dhule Crime 18 bikes worth 9 lakhs seized from LCB)

पिंपळनेर (ता. साक्री) शहरातील राजेंद्र रामभाऊ सोनवणे (रा. एकवीरानगर, पिंपळनेर) या शेतकऱ्याची देशशिरवाडे (ता. साक्री) शिवारातील शेतातून चोरट्याने दुचाकी (एमएच १८ बीजे २५५९) लंपास केली. ही घटना एक एप्रिलला सायंकाळी घडली. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यासह जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याची सूचना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना दिली.

कुसुंब्यात कारवाई

देशशिरवाडे येथील दुचाकी चोरीचा गुन्हा हा संशयित एकनाथ हिरामण सोनवणे (वय २९, रा. अजंग वडेल, ता. मालेगाव, जि. नाशिक) याने साथीदारांच्या मदतीने केल्याचे आणि तो साथीदारांसह कुसुंबा (ता. धुळे) बस स्थानकाजवळ असल्याची माहिती मंगळवारी (ता. २३) पोलिस निरीक्षक पवार यांना मिळाली.

त्यानुसार एलसीबीचे पथक तत्काळ रवाना झाले. पथकाने कुसुंबा येथे संशयित एकनाथ सोनवणे, आधार भारत माळी (वय २८, सावतावाडी वडनेर, ता. मालेगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हे कृत्य त्यांचा साथीदार विशाल पंडित अहिरे (वय २२, रा. बल्हाणे, ता. धुळे) याच्यासह केल्याची कबुली दिली. (latest marathi news)

Shrikant Dhiware, Shriram Pawar, Shrikrishna Pardhi and action team present during the inspection of the bikes seized by LCB.
Dhule Crime News : गावठी पिस्तूलसह फोटो काढणे पडले महागात!

गुन्ह्यांचीही उकल

पथकाने पिंपळनेर येथून विशाल अहिरे याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत संशयित तिघांनी जिल्ह्यातून चोरी केलेल्या दुचाकी अजंग वडेल, बल्हाणे येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. तेथून पथकाने एकूण १८ दुचाकी जप्त केल्या. त्यांची एकूण किंमत नऊ लाख दहा हजार आहे. जप्त दुचाकींपैकी पिंपळनेर पोलिस ठाण्यात दाखल पाच, मोहाडी (धुळे) पोलिस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांची उकल झाली.

पोलिस अधीक्षक धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक पवार, सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, अमरजित मोरे, अमित माळी, प्रकाश पाटील, संजय पाटील, संदीप सरग, संतोष हिरे, संदीप पाटील, मायूस सोनवणे, तुषार सूर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Shrikant Dhiware, Shriram Pawar, Shrikrishna Pardhi and action team present during the inspection of the bikes seized by LCB.
Dhule Crime News : एटीएम चोरीच्या प्रयत्नातील तिघांना अटक! क्रूझर जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.