Dhule Crime News : पावणेदोन लाख लूट प्रकरणी नाशिकचे 2 संशयित अटकेत

Dhule News : पावणेदोन लाखांची लूट करणाऱ्या नाशिकच्या दोन संशयितांना धुळे तालुका पोलिसांनी मंगळवारी (ता. २) अटक केली. त्यांच्याकडून रोकडसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
Officers and team of Taluka Police Station present with suspects in custody in case of robbery.
Officers and team of Taluka Police Station present with suspects in custody in case of robbery.esakal
Updated on

Dhule News : पावणेदोन लाखांची लूट करणाऱ्या नाशिकच्या दोन संशयितांना धुळे तालुका पोलिसांनी मंगळवारी (ता. २) अटक केली. त्यांच्याकडून रोकडसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ईश्वरलाल अभिमन सोनवणे (रा. कल्याण) हे एक लाख ७० हजारांची रोकड घेऊन कल्याण येथून नाशिकला आले. तेथे गौतम गंगाराम पगारे (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) याची भेट घेत त्यांना पैसे आणल्याबाबत सांगितले. (Dhule Crime 2 suspects of Nashik arrested in case of Rs 2 lakh stolen)

नंतर पगारे यांना फोन करून खासगी गाडी (एमएच ०२, सीडब्ल्यू ९६१२) भाडेतत्वावर बुक केली. सोमवारी (ता. १) दुपारी एकच्या सुमारास गाडीतून गौतम व ईश्वरलाल सोनवणे धुळ्याकडे रवाना झाले. वार-कुंडाणे (ता. धुळे) फाट्याजवळील एका हॉटेलच्या अलीकडे सायंकाळी सातच्या सुमारास वाहनचालकाने गाडी थांबविली.

गौतम पगारे यांनी टायरमध्ये हवा कमी वाटत आहे, त्यामुळे तुम्ही खाली उतरून चेक करा, असे सोनवणे यांना सांगितले. सोनवणे उतरताच पगारे आणि चालकाने गाडी भरधाव नेली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Officers and team of Taluka Police Station present with suspects in custody in case of robbery.
Pune Crime News : कामगाराचा खून करणाऱ्या पर्यवेक्षकाला जन्मठेपेसह 5 हजाराची दंडाची शिक्षा

घटनेतील वाहन अजनाळे बारी पोलिस चौकी येथे मिळून आले. तालुका पोलिसांनी गौतम पगारे व नवाज हनीज शेख (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) या दोघांना अटक केली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे.

पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, महादेव गुट्टे, किशोर सोनवणे, प्रवीण पाटील, कुणाल पानपाटील, अविनाश गहिवड, संतोष देवरे, मुकेश पवार, विशाल पाटील, सनी सांगळे, रवींद्र सोनवणे, कुणाल शिंगाणे, कांतिलाल शिरसाट यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Officers and team of Taluka Police Station present with suspects in custody in case of robbery.
Pune Crime News : ‘हवेत उडणारे’ चोरटे अखेर जमिनीवर ; विमानाने पुण्यात येऊन चोरी करणारी राजस्थानमधील टोळी गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.