Dhule Crime News : दोंडाईचात 21 जणांवर गुन्हा; पोलिसांकडून 7 संशयित ताब्यात

Dhule Crime : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) शहरातील एका मिरवणुकीवर एका गटाकडून दगडफेक झाली. त्यात अनेक जण जखमी झाले.
Crime
Crime esakal
Updated on

Dhule Crime : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) शहरातील एका मिरवणुकीवर एका गटाकडून दगडफेक झाली. त्यात अनेक जण जखमी झाले. अनपेक्षित झालेल्या दगडफेकीमुळे पळापळ होऊन परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिस प्रशासनाने वेळीच दखल घेत शांतता निर्माण केली. याप्रकरणी २१ जणांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले. (Dhule Crime)

या प्रकरणी कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. अफवा पसरू नये. शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर केले. गोविंदा गुलाब नगराळे (रा. दोंडाईचा) यांच्या फिर्यादीनुसार रविवारी (ता. १४) सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.

निर्धारित मार्गाने शांततेने मिरवणूक जात असताना रात्री पावणेअकराच्या सुमारास संशयित साहिल लाला बागवान, समीर लाला बागवान, इसाक मिस्तरी, पापा तन्वीर शाह, सादिक फारुक शाह, कल्लू पठाण, वसीम पठाण, सुलतान बिल्डर, जुनेद फिरोज शाह, जुनेद शाह याचा भाऊ कालू, रजा पिंजारी (सर्व रा. दोंडाईचा), विहान बागवान (ज्यूसवाला), कौसर मुसा खाटीक, तौफिक (कपबशीवाला), मोना (चिली सेंटरवाला). (latest marathi news)

Crime
Nashik Crime News : परिक्षेत्रातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा दणका! महिनाभरात सव्वा नऊ कोटींचा मुद्देमाल जप्त

शोएब मुस्ताक (ड्रायफिशवाला), फुकऱ्या शाह, इम्रान भिकन पिंजारी (गादीवाला), आज्या खाटीक, समीर आत्तार मन्यार व गाजी सफा खाटीक यांनी लोकांवर दगडफेक करत मिरवणूक बंद पाडली. दहशत निर्माण करत आरडाओरडा करून शांततेचा भंग केला. दगडफेकीत मिरवणुकीत सहभागी गोविंदा नगराळे यांच्यासह अन्य महिला.

पुरुष व मुले जखमी झाले. दगडफेक करणारे मिरवणुकीच्या गर्दीत पळून गेले. दरम्यान, बंदोबस्तावरील पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण आणले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती जाणून घेतली.

Crime
Crime News: दुकानांच्या तोडफोडप्रकरणी २५ ते ३० जणांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.