वकवाड : कडाईपाणी (उर्मदा) येथे अवैधरीत्या कत्तलीचा व्यवसाय करून गोमांस विक्रीच्या उद्देशाने दोन पिक-अपसह गोठ्यात बांधून ठेवलेल्या २८ जनावरांची सुटका करून गोशाळेत पाठविण्यात आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, वाहनांसह सात लाख ५३ हजारांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना कडाईपाणी येथे कत्तलीचा व्यवसाय करणारे लतीफ जाकीर, अबरार जफर मुजावर, बादल गंगाराम चौहान यांच्या पिकअप (एमएच-०४, डीके ५९३८ व एमपी-६८, जी ०५८५) वाहनात गोवंश जातीचे जनावरे भरून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची बातमी मिळाली होती. (28 cattle rescued from Kadipani goods worth seven lakh seized )