Dhule Crime News : अमली पदार्थ तस्करी प्रकरणी 29 अटकेत; दाखल 21 गुन्ह्यात 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Crime News : या कारवाईत एकूण २ कोटी १२ लाख ९२ हजार ३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २९ आरोपी अटकेत आहेत, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
Drugs Crime
Drugs Crimeesakal
Updated on

Dhule Crime News : जागतिक अमली पदार्थविरोधी दिन २६ जूनला साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यंदा जानेवारी ते १८ जूनपर्यंत अमली पदार्थ तस्करी प्रकरणी २१ गुन्हे दाखल झाले आहेत. पैकी १८ गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत एकूण २ कोटी १२ लाख ९२ हजार ३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २९ आरोपी अटकेत आहेत, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली. (Dhule Crime 29 arrested in drug trafficking case)

जागतिक अमली पदार्थ विरोधीदिनानिमित्त जिल्ह्यात अमली पदार्थांच्या दुष्परिणांमाची माहिती देण्यासाठी २६ जूनला जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी दिली.

धुळ्यात बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी (ता. २०) जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक झाली. श्री. गावंडे अध्यक्षस्थानी होते. सहायक पोलिस अधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक बी. टी. अहिरे, प्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक परिवहन अधिकारी राहुल कदम, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील डॉ. महेश भडांगे, अन्न व औषधे प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक कि. सु. देशमुख, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. नितीन पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र व्यवस्थापक प्र. भा. पवार, टपाल विभागाचे एम. ए. बाविस्कर आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे प्रबोधन

निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे म्हणाले, की जिल्ह्यात २६ जूनला जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबवून अमली पदार्थांच्या दुष्परिणांमाची माहिती नागरिकांना दिली जावी. शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अमली पदार्थांविरोधात उपयुक्त माहिती देऊन जनजागृतीपर अभियान राबवावे. अमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणांमाची माहिती देण्यात यावी.

समुपदेशन करावे

जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल रुग्णांचे समुपदेशन करावे. वस्तु व सेवा कर विभागाने पोलिस विभागाच्या सहयोगाने अमली पदार्थांचे सेवन व वापराबाबत संयुक्तिक कार्यशाळेचे आयेाजन करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाने महापालिका व ग्रामीण क्षेत्रातील औषध विक्रेत्यांच्या दुकानात अनपेक्षित भेट देऊन स्टॉक रजिस्टरची पडताळणी करावी. औषध विक्रेते डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषधे विक्री करत असल्यास अशा औषध विक्रेत्यांवर कारवाई करून त्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात यावी, अशी सूचना श्री. गावंडे यांनी दिली. (latest marathi news)

Drugs Crime
Jalgaon Crime: जामनेरला पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक! बालिका खून प्रकरणी संशयिताच्या अटकेनंतर उद्रेक; 10 ते 12 पोलिस जखमी

कारवाईची सूचना

सहायक पोलिस अधीक्षक रेड्डी म्हणाले, की जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री, लागवड, सेवन होणार नाही याबाबत सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिली गेली आहे. असे काही प्रकार आढळून आल्यास कारवाईचे निर्देश आहेत. तसेच शाळा, महाविद्यालयात इतर विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याची सूचना त्यांनी यंत्रणेला दिली.

जिल्ह्यात जानेवारी ते जूनपर्यंत अमली पदार्थ विरोधात २१ गुन्हे दाखल असून १८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत एकूण दोन कोटींवर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती श्री. रेड्डी यांनी दिली.

वाहनाचा परवाना रद्द करावा

वनक्षेत्रात अवैध गांजा, अफू लागवड क्षेत्राची माहिती घ्यावी व त्या माहितीच्या आधारे संयुक्तिक कारवाई करावी. जिल्ह्यात खास करून शिरपूर तालुक्यात खसखस (अफू) किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता महसूल आणि कृषी, वन विभागाने घ्यावी. तसेच या भागात धडक मोहीम राबवावी.

एमआयडीसी परिसरात अवैध दारू विक्री मोठया प्रमाणात होत असून त्याठिकाणी संबंधित विभागाने कारवाई करावी. प्रादेशिक परिवहन विभागाने अमली पदार्थ वाहतूक करताना आढळलेल्या वाहनाचा कायमस्वरूपी वाहन परवाना व संबंधित व्यक्तीचा वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, अशी सूचना श्री. गावंडे यांनी दिली

Drugs Crime
Nashik MD Drugs Crime : नाशिकवरती ‘एमडी’चे ढग कायम! दीड लाखांच्या ड्रग्जसह दोघे पेडलर अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.