Dhule Crime : 33 दुचाकी जप्त; 32 गुन्ह्यांची उकल! चोवीस वर्षांच्या गुन्हेगाराचा कारनामा; फिर्यादींना संपर्काचे आवाहन

Latest Crime News : या कारवाईमुळे धुळे, पुणे, शिर्डीसह विविध जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यात दाखल ३२ गुन्ह्यांची उकल झाली.
A team of officers and staff present with the bikes seized by the police
A team of officers and staff present with the bikes seized by the policeesakal
Updated on

Dhule Crime : ‘एलसीबी’च्या पोलिस पथकाने गुरुवारी (ता. ३) चोवीसवर्षीय सराईताला गजाआड केले. त्याच्याकडून सुमारे २२ लाख २५ हजार किमतीच्या एकूण ३३ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे धुळे, पुणे, शिर्डीसह विविध जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यात दाखल ३२ गुन्ह्यांची उकल झाली. (33 bikes seized 32 crimes solved theft by 24 year old criminal)

शहरातील गरुड कॉम्लेक्ससमोरून ३ मार्चला सायंकाळी जितेंद्र गुलाबराव पाटील (रा. धुळे) यांची दुचाकी (एमएच १८ एबी २४४४) चोरट्यांनी लंपास केली. याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ‘एलसीबी’कडून समांतर तपास सुरू असताना गुरुवारी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना माहिती मिळाली, की हा गुन्हा बळसाणे (ता. साक्री) येथील संशयित योगेश शिवाजी दाभाडे (वय २४) याने केला आहे.

त्यानुसार ‘एलसीबी’ पथकाने बळसाणेतून संशयित दाभाडे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच धुळे, शिंदखेडा, पुणे, शिर्डी, मालेगाव, सटाणा, चाळीसगाव, नंदुरबार येथून एकूण ३३ दुचाकी चोरी केल्याचेही कबूल केले. पोलिसांनी त्या दुचाकी हस्तगत केल्या. संशयित दाभाडे याला धुळे शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, प्रकाश पाटील, संजय पाटील, मायूस सोनवणे, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, धमेंद्र मोहिते, योगेश जगताप, किशोर पाटील, अतुल निकम व हर्शल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. (latest marathi news)

A team of officers and staff present with the bikes seized by the police
Dhule Crime News : अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून गोळीबार; रामपुरा फाटा परिसरात तीन जखमी

दाभाडेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे

संशयित दाभाडे याच्यावर हिंजवडी (पुणे) पोलिस ठाण्यात चेनस्नॅचिंग गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. त्या गुन्ह्यात तो फरारी होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी रामानंद पोलिस ठाणे (जळगाव), भोसरी (पुणे), पिंपरी (पुणे), पारोळा (जि. जळगाव), शहर (धुळे), अंबड (नाशिक), गंगापूर (नाशिक), दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जप्त दुचाकींपैकी धुळे शहरातील ११, नाशिक जिल्ह्यातील १४, पुणे तीन, जळगाव दोन, शिर्डी व नंदुरबार येथे दाखल प्रत्येकी एका दुचाकीचा समावेश आहे.

"‘एलसीबी’ने हस्तगत केलेल्या दुचाकींचे चेसीस व इंजिन क्रमांकावरून चोरीस गेलेल्या दुचाकींची फिर्यादींनी प्रत्यक्ष खातरजमा करून घ्यावी. तसेच कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून दुचाकी धुळे शहर पोलिस ठाण्यातून ताब्यात घ्यावी."- श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, धुळे

A team of officers and staff present with the bikes seized by the police
Dhule Fraud Crime : फर्मची 61 लाखांत फसवणूक; धुळ्यात अकाउंटंटला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.