Dhule Crime News : लोहगाव (ता. शिंदखेडा) येथील संतकृपा कृषी सेवा केंद्रात अनधिकृतरीत्या व विनापरवाना अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून कृषी विभागाने एचटीबीटीची ६५० पाकिटे जप्त करून शिंदखेडा पोलिस ठाण्यात कृषी केंद्र संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभागाने बुधवारी (ता. १५) सकाळी ही कारवाई केली. (650 packets of HTBT cotton seeds seized by police )
लोहगाव येथे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण तायडे, शिंदखेडा पंचायत समितीचे कृषी अधिकारी अभय कोर, शासकीय पंच म्हणून साक्री पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश नेतनराव, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक चेतन कंखरे आदींनी गोपनीय माहिती मिळाल्यावरून लोहगाव येथील हेमंत बापूराव पाटील (वय ४२, रा. लोहगाव) यांचे लोहगाव ते वसमाने रस्त्यावरील खोलीत पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या १३ गोण्यांमध्ये बोगस, संशयीत अनधिकृत एचटीबीटी संकरित कापूस बियाणे आढळून आले.
सर्व गोण्या पंचांसमक्ष सीलबंद करण्यात येऊन शिंदखेडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या. शिंदखेडा पोलिस ठाण्यात संतकृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक ईश्वरसिंग चिंतामण माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.
''प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल. त्यांची गय केली जाणार नाही.''- मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.