Dhule Crime: शिंदखेड्यात लॉजवरील छाप्यात विवाहितेसह 7 जण पकडले! पोलिसांची पहिली कारवाई; लॉजमालक, वेटरविरोधात गुन्हा दाखल

Crime News : ही लॉज रहदारीच्या रस्त्यावर असल्याने तरुण व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तरुण व तरुणींना समज देऊन सोडून देण्यात आले.
Crime News
Crime News esakal
Updated on

चिमठाणे : शिंदखेडा शहरातील परिवहन महामंडळाच्या बसस्थानकासमोरील मातोश्री लॉजवर मंगळवारी (ता. १६) सकाळी अकराच्या सुमारास अश्लील चाळे करताना विवाहितेसह तीन महाविद्यालयीन तरुणी व एक विवाहित तरुण आणि दोन महाविद्यालयीन तरुण असे सात जण शिंदखेडा पोलिसांना छाप्यात सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

ही लॉज रहदारीच्या रस्त्यावर असल्याने तरुण व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तरुण व तरुणींना समज देऊन सोडून देण्यात आले. लॉजमालक व वेटर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (7 people including married woman caught in raid on lodge in Shindkheda)

शिंदखेडा बसस्थानकासमोरील मातोश्री लॉजवर महाविद्यालयीन तरुण व तरुणींसाठी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची गुप्त बातमी शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाल्यावरून हवालदार इकलाख पठाण, हवालदार अनंत पवार, हवालदार हेमराज जाधव, महिला पोलिस कर्मचारी सुनीता परदेशी, रजनी पाटील व चालक चेतन माळी यांनी लॉजवर छापा टाकला असता वेगवेगळ्या तीन रूममध्ये तीन तरुण व चार तरुणी अश्लील चाळे करताना मिळून आले.

त्यांना ताब्यात घेऊन समज देऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. लॉजमालक हरीश संतोष जाधव (वय ४२, रा. जाधवनगर, शिंदखेडा) व लॉजवरील वेटर अनिल बळिराम वरसाळे (रा. शिंदखेडा) लॉजमध्ये बेकायदेशीररीत्या परिसरातील नागरिकांना उपद्रव निर्माण होईल अशा रीतीने महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी जागा उपलब्ध करून देत असत. (latest marathi news)

Crime News
Nashik Crime News : अवघ्या 15 मिनिटांत दोघींच्या सोन्याच्या पोती खेचल्या; मखमलाबाद रोडवरील घटना

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी केली. हवालदार अनंत पवार तपास करीत आहेत.

अनेक वर्षांपासून अवैध व्यवसाय

शिंदखेडा शहरातील मातोश्री लॉज राज्यमार्ग बारा लगत, बसस्थानक समोर, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ व व्यावसायिक मॉल जवळ अशा गजबजलेल्या ठिकाणी असून, मालक रूम उपलब्ध करून देत होता. शिंदखेडा आगाराच्या मुक्कामाच्या खेड्यातील एसटी बस परत आल्यावर सकाळी सातपासून या लॉजवर महाविद्यालयीन तरुण व तरुणींची एकच वर्दळ सुरू होती.

Crime News
Dhule Crime News: बुलढाण्याच्या व्यावसायिकाची छडवेलजवळ सिनेस्टाइल लूट; निजामपूर पोलिसांत 15 जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.