Dhule Crime News : 2 बियाणे विक्रेत्यांवर गुन्हा; जादा दराने विक्री

Dhule Crime : जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे बियाणे निरीक्षक तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विंचूर (ता. धुळे) चौफुलीवर ही कारवाई झाली.
Seeds
Seedsesakal
Updated on

Dhule Crime News : कापूस बियाण्यांची जादा दराने विक्री करीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी धामणगाव (ता. धुळे) येथील दोघांवर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे बियाणे निरीक्षक तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विंचूर (ता. धुळे) चौफुलीवर ही कारवाई झाली. ( 2 cotton seed sellers selling at exorbitant rates )

सचिन सुकलाल पाटील व नीलेश निंबा पाटील (रा. धामणगाव, ता. धुळे) यांनी एचवाय कॉटन सिड्स वाण तुलसी-१४४ बीजी या कापूस बियाण्यांची जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला. त्यानुसार जादा दराने कापसाचे बियाणे विक्री करणाऱ्या कृषीधन ॲग्रो एजन्सीज (विंचूर) येथे बनावट ग्राहक पाठवून कृषी विभागीय व जिल्हा भरारी पथकाच्या सदस्यांनी संबंधितांना शिताफीने पकडले.

Seeds
Dhule Crime News : बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त! 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

एका आठवड्याच्या आत अशा सलग तीन कारवायांमुळे जादा दराने विक्री करणाऱ्या कापूस बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

नाशिकस्थित तंत्र अधिकारी यू. पी. ठाकूर, मोहीम अधिकारी प्रदीप निकम, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद पानपाटील, कृषी अधिकारी जे. एस. बोराळे, कृषी अधिकारी राजेश चौधरी, कृषी अधिकारी रमेश नेतनराव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Seeds
Dhule Crime News : वकिलासह परिचारिकेचे घर फोडले! वडजाई येथील प्रकार; रोकडसह 2 लाखांचा ऐवज लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.