Dhule Crime : फरारी 3 गांजा उत्पादकांवर गुन्हा! सांगवी पोलिसांची ड्रोनद्वारे हायटेक कारवाई; 34 लाखांवर मुद्देमाल जप्त

Latest Crime News : कारवाईपूर्वीच चार संशयितांना अटक केली असून, त्यांनी दिलेल्या माहितीवरुन अन्य तीन फरारी तीन गांजा उत्पादकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
Sangvi police with measured ganja and suspects
Sangvi police with measured ganja and suspectsesakal
Updated on

शिरपूर : रोहिणी (ता. शिरपूर) परिसरात ड्रोनने टेहळणीतून केलेल्या कारवाईदरम्यान जप्त गांजा मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल दोन दिवस लागले. गांजाची झाडे कापणे, त्यांची वाहतूक आणि मोजणी अशा दमछाक करणाऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तब्बल १७ क्विंटल आणि ४० किलो गांजा जप्त केल्याचे निष्पन्न झाले. कारवाईपूर्वीच चार संशयितांना अटक केली असून, त्यांनी दिलेल्या माहितीवरुन अन्य तीन फरारी तीन गांजा उत्पादकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. (Crime against 3 fugitive ganja producers Sangvi Police)

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना माहिती मिळाल्यावर त्यांच्या मार्गदर्शनासाठी सांगवी पोलिसांनी बुधवारी (ता. २५) सकाळी रोहिणीजवळ बोमल्यापाडा परिसरात ड्रोन आणि गुगल मॅपच्या मदतीने हायटेक कारवाई केली. त्यात सूरज पावरा, रोहित पावरा, समीर पावरा व रसलाल पावरा (सर्व रा. रोहिणी) यांना अटक केली होती.

त्यानंतर तुकड्या तुकड्यातील शेतात ऊस आणि कापसातील गांजाची झाडे उपटून काढली. वाहनात भरुन हा मुद्देमाल सांगवी पोलिस ठाण्यात नेण्यात आला. तेथे त्याची मुळे, फांद्या, पाने आदि प्रतवारी करुन वजन करण्यात आले. ते एक हजार ७४० किलो भरले. त्याची बाजार भावानुसार किंमत ३४ लाख ८० हजार रुपये आहे. (latest marathi news)

Sangvi police with measured ganja and suspects
Pune Crime News: वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट! पोलिस तपासामध्ये मध्य प्रदेश कनेक्शन आलं समोर

संशयित कोठडीत

अन्य तीन गांजा उत्पादक रणजीत पावरा, युवराज पावरा व भिमा पावरा हे कारवाईदरम्यान झुडुपाआड पळून गेले असून त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

पोलिस अधीक्षक धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक सुनील वसावे, मिलिंद पवार, हवालदार चत्तरसिंह खसावद, सागर ठाकूर, जाकिरोद्दीन शेख, रमेश माळी, संजय चव्हाण, राजू ढिसले, सुरेश पावरा, मोहन पाटील, प्रकाश भिल, रोहिदास पावरा, ग्यानसिंह पावरा, धनराज गोपाळ, सागर कासार यांनी ही कारवाई केली.

Sangvi police with measured ganja and suspects
Jalgaon Crime News : सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकाऱ्यास मारहाण! आमदार येऊन गेले अन्‌ कंत्राटदाराकडून मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.