Dhule Crime News : पोलिसांवर हल्ला प्रकरणी जमावावर गुन्हा!

Dhule Crime : पोलिस ठाण्यावर हल्ला करून चार पोलिसांना गंभीर केल्यासह दंगल, शासकीय कामात अडथळा आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी सुमारे ८० जणांच्या जमावाविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
Crime against mob in case of attack on police
Crime against mob in case of attack on policeesakal
Updated on

शिरपूर : पोलिस ठाण्यावर हल्ला करून चार पोलिसांना गंभीर केल्यासह दंगल, शासकीय कामात अडथळा आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी सुमारे ८० जणांच्या जमावाविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. निष्पन्न संशयितांमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे. (Dhule Crime against mob in case of attack on police station)

दरम्यान, करवंद (ता. शिरपूर) येथे शांतता असून, गावात पोलिस बंदोबस्त कायम ठेवला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयितांचे धरपकड सत्र सुरू केले आहे. करवंद येथे २४ एप्रिलला रात्री मेंदीच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादातून विजय सुदाम कोळी याच्यासह अन्य तिघांनी जामा नामा भिल (रा. करवंद) याचा खून केल्याची घटना घडली.

नंतर २५ एप्रिलला दुपारी बाराला करवंद येथील मृताचे नातलग व जमावाने शिरपूर शहर पोलिस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढला होता. जामा भिल यांच्या खून प्रकरणातील संशयिताला ताब्यात देण्याची मागणी जमावाने केली. तसेच पोलिस ठाण्यावर दगड, विटा, लाठ्याकाठ्या, हातोडा, लोखंडी गज आणि कौले आदींच्या सहाय्याने हल्ला चढविला.

सीसीटीव्ही फोडला

जमावाच्या हल्ल्यात पोलिस नाईक पौर्णिमा पाटील, प्रतिभा देशमुख, मुन्नी तडवी व मनोज पंडित गंभीर जखमी झाले. पोलिस ठाण्याचे प्रवेशद्वार, बॅरिकेड, सीसीटीव्ही आदींची तोडफोड जमावाने केली. अखेर अश्रुधुराचा वापर, लाठीमारातून पोलिसांनी जमाव पांगविला.

Crime against mob in case of attack on police
Nashik Crime News : चाडेगाव गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

जमावावर गुन्हा

हवालदार हेमंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शासकीय कामात अडथळा आदी आरोपांवरून संशयित जितेंद्र भिल, लुका पवार, सुरेश भिल, मोहसीन पठाण, योगेश भिल, राहुल भिल, खंड्या भिल, कोकिळाबाई भिल, अलकाबाई भिल, ज्योतीबाई भिल, इंदूबाई भिल, गोडमबाई भिल हिच्यासह अन्य ७० ते ८० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक रोशन निकम तपास करीत आहेत.

मृताविरोधातही गुन्हा

दरम्यान, खून प्रकरणातील प्रमुख संशयित विजय सुदाम कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २४ एप्रिलला रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान करवंद गावातील आनंदवाडी वस्तीत मेंदीच्या कार्यक्रमात किरकोळ वादातून संशयित योगेश संदीप भिल.

जामा नामा भिल, राहुल पंढरीनाथ भिल व खंड्या भिल (सर्व रा. करवंद) यांनी लाकडी दांड्यासह दगडाने त्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांमध्ये मृत जामा भिल याचाही समावेश आहे.

Crime against mob in case of attack on police
Crime News: कानात इअरफोन, हेल्मेट नाही! स्कूटरवरुन जाणाऱ्या 28 वर्षीय महिलेच्या मोबाईलचा स्फोट झाला अन्

चिथावणीचा संशय

आनंदवाडी वस्तीसह करवंद गावात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. २५ एप्रिलला सायंकाळी जामा भिल याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर गावातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त कायम ठेवला आहे.

पोलिस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा पोचल्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक केली असून, कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र जमाव तेथेच थांबून राहिला. जमावातील निष्पन्न संशयित इतरांना चिथावणी देत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

"शिरपूर पोलिस ठाण्यावरील हल्ला प्रकरणी दाखल गुन्ह्यात गंभीर कलमांचा अंतर्भाव केला आहे. संशयितांचे धरपकडसत्र सुरू करण्याचे निर्देशित केले आहे. करवंद येथे शांतता प्रस्थापित असून, अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शांततेकामी पोलिसांना सहकार्य करावे." - श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक

Crime against mob in case of attack on police
Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ कायम ; वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन जणांची ६५ लाखांची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.