Dhule Crime News : साक्रीत सत्तरहून अधिक संशयितांवर गुन्हा! किरकोळ कारणावरून दंगल

Dhule News : शहरातील आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला परिसरात दोन गटांत गुरुवारी (ता. ११) रात्री मागील भांडणाच्या कारणावरून तुफान दंगल उसळली.
After the riot that broke out in the city around Thursday night, police force was deployed at the scene.
After the riot that broke out in the city around Thursday night, police force was deployed at the scene.esakal
Updated on

Dhule News : शहरातील आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला परिसरात दोन गटांत गुरुवारी (ता. ११) रात्री मागील भांडणाच्या कारणावरून तुफान दंगल उसळली. यात दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांतील जमावाने धारदार हत्यारांसह काठ्यांचा वापर करीत एकमेकांवर हल्ला चढविला. (Crime against more than seventy suspects)

या घटनेत पाच जण जखमी झाले असून, परस्पर फिर्यादीनुसार ७० हून अधिक संशयितांवर दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाईबाबत कठोर पवित्रा घेतल्याने स्थिती नियंत्रणात आली. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

हत्यारांसह हल्ला

आंबेडकर चौक परिसरावर चांदतारा मोहल्ला परिसरातील काही तरुणांनी दगडफेक केली. काही काळाने या कृतीचे दंगलीत रूपांतर झाले. रात्रीच्या सुमारास दोन गटांतील जमावाने एकत्र येत लाठ्या-काठ्या, तलवार, कोयते, चाकूच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणी एका गटातील प्रेम घनशाम वाघ (रा. आंबेडकर चौक, साक्री) या तरुणाने साक्री पोलिसांकडे फिर्याद दिली.

त्यात म्हटले आहे, की मागील भांडणाची कुरापत काढून मुस्तफा पठाण, नदीम फिरोज शहा, मुस्तफा शेख, अरबाज इक्बाल तांबोळी, शमीर मिर्झा, नयीन जेमाल बेलदार, अली जाकिर शेख, लकी जाकिर शेख, रिजयान युसूफ पठाण, वसीम तांबोळी, सद्दाम (पूर्ण नाव निष्पन्न नाही), शोएब मुनाफ पठाण, सुलतान खाटीक. (latest marathi news)

After the riot that broke out in the city around Thursday night, police force was deployed at the scene.
Dhule Hire Medical College : ‘ह्यूमन राइट’कडून हिरे मेडिकलचे पोस्टमॉर्टम! सचिवांकडून चौकशी

रईस रहीम बेलदार, अशफाक बेलदार, आरिफ शेख, जाकिर गफ्फूर शेख तसेच इतर २५ जण (सर्व रा. साक्री) गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एकत्र आले. त्यांनी ठार करण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात मोठा भाऊ राज वाघ, जय मोरे, कपिल वाघ, विशाल खरे, वेदिका अहिरे गंभीर जखमी झाले. तसेच या मारहाणीत एका मालवाहतूक रिक्षावर दगडफेक झाल्याने रिक्षाचेही नुकसान झाले. पोलिस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ तपास करीत आहेत.

दुसऱ्या गटाची फिर्याद

दुसऱ्या गटाकडून परस्पर फिर्यादीत अरबाज एकबाल तांबोळी या तरुणाने म्हटले आहे, की गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास एवन नामक चिकन शॉप येथे झोपण्यासाठी गेलो असताना मागील भांडणाची कुरापत काढून कपिल वाघ, राज वाघ, प्रदीप मोहिते, उमेश वाघ, अतुल वाघ, दश पाथरे, उदय मोरे.

After the riot that broke out in the city around Thursday night, police force was deployed at the scene.
Dhule News : दक्षता बाळगत वीज अपघात टाळावे! महावितरणचे आवाहन; धुळे, नंदुरबारसाठी संपर्क क्रमांक जाहीर

जय मोरे, बंटी चांभार, निखिल गौंड, भय्या टँकरवाला, गौतम आखाडे याच्यासह १५ ते २० जणांनी (सर्व रा. आंबेडकर चौक) हातात लाठ्या-काठ्या, तलवार, कोयते, चाकू घेऊन हल्ला चढविला. मित्रांनी या हल्लेखोरांपासून वाचवीत साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या फिर्यादीची दखल घेत वरील सर्व संशयितांवर साक्री पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी तपास करीत आहेत.

धिवरे यांचे शांततेसाठी आवाहन

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. श्री. धिवरे यांनी घटनेची माहिती घेतल्यावर दोन्ही गटांतील समुदायांना शांततेचे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहील अशी वर्तणूक करत शांततेचे आवाहन त्यांनी केले. साक्री शहरात घटनास्थळी बंदोबस्त तैनात असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

After the riot that broke out in the city around Thursday night, police force was deployed at the scene.
Dhule News : अनेर लाभक्षेत्रातील नाल्यांवरील बंधारे पुनर्भरणासाठी 27 कोटी मंजूर; आमदार पटेल, पावरांचा पाठपुरावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com